स्मार्ट आधार कार्ड अवैध; मूळ आधार कार्ड कसे मिळवाल? जाणून घ्या अधिक

स्मार्ट आधार कार्ड अवैध; मूळ आधार कार्ड कसे मिळवाल? जाणून घ्या अधिक
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : बाजारात वेगवेगळ्या प्रकारात बनविलेले स्मार्ट आधार कार्ड आता ग्राह्य धरले जाणार असे स्पष्टीकरण आधार कार्डची निर्मिती करणाऱ्या 'युनिक आयडेंडिफिकेशन अथाॅरिटी ऑफ इंडिया' अर्थात यूआडीएआय यांनी दिले आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात आपली आधार नोंदणी केली की, बाजारातून तयार केलेले स्मार्ट आधार कार्ड तयार करून घेतात. असे कार्ड्स आता चालणार नाहीत, असे स्पष्टीकरण आधार प्राधिकरणाने दिलेले आहे. आधार प्राधिकरणाने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

आधार कार्ड रुपांतर स्मार्ट कार्डमध्ये केल्यामुळे त्यामध्ये सुरक्षाविषयक अनेक त्रूटी असतात. अशा कार्डमध्ये सुरक्षाविषयक फिचर नसते. त्यामुळे आम्ही अशा कार्ड्सनां अवैध घोषित करत आहे, असेही आधार प्राधिकरणाने म्हटलेलं आहे.

मूळ आधार कार्डवर कोणते फिचर्स असतात? 

आधारचे पीव्हीसी कार्ड पाहिजे असेल, तर केवळ ५० रुपये भरून आपण अधिकृतरीत्या ते मिळवू शकता. ते प्राधिकरणाकडून पोस्टाने पाठविले जाईल. मूळ आधार पीव्हीसी कार्डात डिजिटली साईनड् सुरक्षित क्यूआर कोड असतो. ते छायाचित्रासह येते. त्यात लोकसांख्यिकी तपशील (डेमाॅग्राफिक डिटेल्स) असतो, तसेच सर्व सुरक्षा फिचरही त्यात असतात.

१) सुरक्षित क्यूआर कोड

२) होलोग्राम

३) माइक्रो टेक्स्ट

४) कार्ड जारी केल्याची व प्रिंट केल्याची तारीख

५) लोकसांख्यिकी तपशील

मूळ आधार कार्ड कसे मिळवाल?

१) मूळ आधार कार्ड प्राधिकरणाच्या https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटच्या मदतीने प्राप्त करू शकता.

२) या साइटवर गेल्यानंतर 'ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड' या पर्यायावर क्लिक करा.

३) बारा अंकी आधार क्रमांक अथवा २८ अंकी नोंदणी आयटी टाका. सुरक्षा कोड भरा. त्यानंतर तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल. त्यानंतर अटी व शर्ती स्वीकृत करा.

४) ओटीपी पडताळणीस सबमिट बटन दाबल्यानंतर 'पेमेंट ऑप्शन' दिसेल. तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंग याद्वारे पैसे अदा करू शकता. पैसे अदा झाल्यानंतर पावती मिळेल आणि कार्ड पोस्टाने घरपोच येईल.

हे वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news