राजीव गांधींच्या सहा मारेक-यांची होणार सुटका, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, आरोपींची याचिका मंजूर

राजीव गांधी
राजीव गांधी
Published on
Updated on

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा, : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणा-या सर्व सहा मारेकऱ्यांची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. नलिनी श्रीहरन, रॉबर्ट पायस, रविचंद्रन, सुथती राजा मुरुगन तसेच जयकुमार, अशी या मारकण्याची नावे आहेत,

तामिळनाडू सरकारने यापूर्वीच सर्व दोषींची मुक्तता करण्याची शिफारस केली होती. परंतु राज्यपालांकडून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात आली नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती बी. व्ही. यांच्या खंडपीठाने निकालावेळी नोंदवले. मे महिन्यात या प्रकरणातील पेरावलला सर्वोच्च न्यायालयान मुक्त करण्याचे आदेश दिले होते.

दोषींनी तीस वर्षांहून अधिक काळ तुरुंगात चालवला आहे. तुरुंगातील त्याचे वर्तन चांगले आहे. तुरुंगात असताना दोषींनी विविध पदव्या मिळवल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. हत्याकांडातील दोषी नलिनीने शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी मुक्तता करण्याची मागणी करीत ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तत्काळ मुक्ततेची तिची याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली होती. याला नलिनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

तामिळनाडू सरकारने ९ सप्टेंबर २०१८ रोजी राजीव गांधी हत्याकांडातील दोषींची मुक्तता करण्याची शिफारस केली होती. ही शिफारस राज्यपालांसाठी बंधनकारक असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. घटनेतील कलम १४२ अंतर्गत अनन्यसाधारण अधिकाराचा वापर करीत सर्वोच्च न्यायालयाने १८ मे २०२२ रोजी पेरारिवलन याची मुक्तता करण्याचे आदेश दिले होते. त्याने ३० वर्षांहून अधिक काळ शिक्षा भोगली होती. पेरारिवलनच्या सुटकेच्या आधारावर नलिनी, रविचंद्रन आणि इतर चारजणांनी सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

२१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधी यांची हत्या झाली होती. या प्रकरणात ४१ लोकांना आरोपी बनवण्यात आले होते. यातील १२ आरोपींचा मृत्यू झाला आहे, तर तिघे फरार झाले

कशाच्या आधारावर सुटका?

यावर्षीच्या मे महिन्यात या प्रकरणातील सहआरोपी ए. जी. पेरारिवलन याला न्यायालयाने घटनेच्या कलम १४२ नुसार दिलेल्या विशेष अधिकारांचा वापर करीत मुदतीपूर्वी तुरुंगातून सोडले होते. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने याच निकालाचा आधार घेतला. दोषींनी तीन दशकांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे. तुरुंगातील त्यांचे वर्तन समाधानकारक आहे. तुरुंगात असताना दोषींनी विविध पदव्या मिळवल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

निकाल असमर्थनीय : काँग्रेस

मारेकऱ्यांची सुटका करण्याच्या आदेशाबद्दल काँग्रेसने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अस्वीकारार्ह आणि अयोग्य आहे, असे मत पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी नोंदवले आहे. हा निकाल असमर्थनीय आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

होते. उर्वरित २६ जणांना अटक करण्यात आली होती. यात श्रीलंका तसेच भारतीय नागरिकांचा समावेश होता.

आधी फाशी, मग जन्मठेप अन् आता थेट सुटका

२१ मे १९९९ रोजी निवडणूक प्रचार सभेत धन नावाच्या तामीळ मानवी बॉम्बने स्फोट घडवत राजीव गांधी यांची हत्या केली.

● नलिनी श्रीहरन, मुरूगन ऊर्फ श्रीहरन, रॉबर्ट पारस, रविचंद्रन, सुथती राजा ऊर्फ संथन आणि जयकुमार यांना विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीवर मे १९९९ मध्ये सर्वोच्च न्यालयाने शिक्कामोर्तब केले. . या आरोपींच्या दया अर्जावर निर्णय घेण्यास उशीर केल्याचे कारण देत सुप्रीम कोटाने या सर्वांची फाशी रद्द करत २०१४ मध्ये ही शिक्षा जन्मठेपेत रूपांतरीत केले.

  •  या दरम्यान नलिनी व मुरूगन यांचे लग्नही तुरुंगातच लागले. त्यांना मुलगीही झाली. आणि २००१ मध्ये या मुलीमुळेच नलिनीची फाशी जन्मठेपेत रूपांतरीत झाली.

● फाशीच्या शिक्षेपासून ते थेट तुरुंगातून सटकेपर्यंतचे सर्व मार्ग सर्वोच्च न्यायालयानेच खुले केले. शेवटचा सुटकेचा मार्ग मोकळा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आपल्या विशेष अधिकाराचा वापर केला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news