नाशिक : धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका; चालकाचा सीटवरच मृत्यू, कार रस्त्याच्या कडेला उभी केल्याने पुढील अनर्थ टळला

नाशिक : धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका; चालकाचा सीटवरच मृत्यू, कार रस्त्याच्या कडेला उभी केल्याने पुढील अनर्थ टळला

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

रस्त्यात त्रास होऊ लागल्याने कार रस्त्याच्या कडेला थांबवून उभी केल्यानंतर चालकाचा सीटवर बसलेल्या अवस्थेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली.

  • मनपातील नोकरभरती पुन्हा रखडणार : सेवा प्रवेश नियमावलीने अडले घोडे
    संतोष लहानू पोखरकर (35, रा. धामणगाव आवारी, ता. अकोले) हा युवक कार घेऊन सिन्नर-शिर्डी रस्त्याने वावीवेसकडून संगमनेर नाक्याकडे जात असताना त्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे संतोषने त्याची कार वावी वेस भागात एका दुकानासमोर उभी केली. थोड्या वेळाने दुकानदाराने दुकानासमोरील गाडी पुढे घ्या, असे सांगण्यासाठी आल्यानंतर त्याला ड्रायव्हर सीटवर युवक सीटबेल्ट लावलेल्या अवस्थेत झुकलेला दिसून आला.
  • जितेंद्र आव्हाड : मंजूर लेआऊट प्रकरणी पोलिसांत तक्रार करणार ; ट्विटमुळे खळबळ
    दुकानदाराने तातडीने घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रस्त्याने गाडी चालवत असताना हृदयविकाराचा झटका येऊन गाडीत त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त केला. पोखरकर हे खोपडी येथे सासरवाडीहून गुजरातला नोकरीच्या ठिकाणी जात होते. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस नाईक राहुल निरगुडे अधिक तपास करीत आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news