SIM Card Rule : डिसेंबरपासून सीमकार्ड खरेदीसाठी नवे नियम

SIM Card Rule : डिसेंबरपासून सीमकार्ड खरेदीसाठी नवे नियम
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : एक डिसेंबरपासून मोबाईल सीमकार्डच्या विक्रीसाठीच्या नियमावलीत बदल होणार आहे. सीमकार्डमधील गैरप्रकार आणि बनावटगिरीला चाप लावण्यासाठी नियमावलीत बदल केला जाणार आहे. (SIM Card Rule)

सीमकार्डच्या नियमावलीत बदल करण्यासाठी सरकारने याआधी एक ऑक्टोबरची डेडलाईन दिली होती. त्यानंतर सरकारकडून ही मुदत पुन्हा एक डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली. सीमकार्डच्या खरेदी आणि विक्रीवरील नवीन नियमावलीची अंमलबजावणी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून 1 डिसेंबरपासून देशभरात करण्यात येणार आहे. बनावट सीमकार्ड आढळल्यास यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार असून यामध्ये दंडात्मक कारवाईसह तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. आपण सीमकार्ड खरेदी करणार असाल तर आपणास नव्या नियमावलीची माहिती असायला हवी. (SIM Card Rule)

हे आहेत नियम…

  • सीम विक्री करणार्‍या वितरकाची नोंदणी आवश्यक.
  • पोलिस पडताळणीसाठी जबाबदार राहणार.
  • नियमाचे उल्लंघन केल्यास 10 लाखांपर्यंत दंड.
  • सीमकार्ड खरेदी करताना आधार कार्डसह ओळखीचा सबळ पुरावा लागेल.
  • बल्क सीमकार्ड खरेदीवर मर्यादा येणार, बिझनेस कनेक्शन असणार्‍यांना काही प्रमाणात सीमकार्ड बल्क स्वरूपात मिळणार.
  • एका आयडीवर 9 सीमकार्ड मिळणार.
  • सीमकार्ड डिअ‍ॅक्टिव्हेटचा कालावधी 90 दिवस. (SIM Card Rule)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news