Good news ! सोन्यासह चांदी झाली स्वस्त ; मागील दोन महिन्यांतील नीचांक

Good news ! सोन्यासह चांदी झाली स्वस्त ;  मागील दोन महिन्यांतील नीचांक
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सराफा बाजारात सोन्याची झळाळी कमी झाली असून, मागील काही दिवसांत सोन्यासह चांदीच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या आठ दिवसांत सोन्याच्या भावात तोळ्यामागे 2 हजार रुपये, तर चांदी किलोमागे 2 हजार रुपयांनी उतरली आहे. सोन्याचे दर 58 हजार 500 रुपये प्रतितोळा, तर चांदीचे दर 70 हजार रुपयांवर स्थिरावले आहेत.

देवकर ज्वेलर्सचे दत्तात्रय देवकर म्हणाले, 'फेब्रुवारी महिन्यापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ झाली होती. परिणामी, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी पातळीवर पोहचले होते. मात्र, सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने व चांदीच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी, सराफा बाजारांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवाती पासूनच सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. सध्या सोन्या-चांदीला मिळत असलेले दर हे मागील 2 महिन्यांतील नीचांकी आहेत.'

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news