Shubhman Gill : वर्ल्डकपपूर्वी ‘टीम इंडिया’ला धक्का; शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह

Shubhman Gill : वर्ल्डकपपूर्वी ‘टीम इंडिया’ला धक्का; शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा क्रिकेटर शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. शुभमनची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात  खेळू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतीय संघ रविवारी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. अशा परिस्थितीत या सामन्यापूर्वी टीम इंडिया स्टार फलंदाज शुभमन गिलशिवाय मैदानात उतरू शकते. टीम इंडियाचा हा स्टार फलंदाज गुरुवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या टीम इंडियाच्या नेट सेशनमध्येही सहभागी झाला नव्हता, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. यानंतर त्याच्या डेंग्यूशी संबंधित चाचण्या करण्यात आल्या, त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

शुभमन गिलने आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी करून आपला फॉर्म दाखवला. त्यामुळे गिलला विश्वचषक स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक मानले जात आहे. मात्र स्पर्धेतील पहिल्याच सामन्यापूर्वी त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे सामोर आले आहे. अशा परिस्थितीत भारताचा हा स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भाग घेणार नसल्याचे मानले जात आहे.

या प्रकरणाशी संबंधित लोकांनी सांगितले की, टीम इंडियाचे व्यवस्थापन गिलच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. शुक्रवारी चाचणीची दुसरी फेरी होणार आहे. यानंतरच शुभमन गिल कांगारू संघाविरुद्ध खेळणार की नाही याचा निर्णय होणार आहे.

शुभमनची जागा कोण घेणार?

मिळालेल्या माहितीनुसार, जर शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला तर इशान किशन भारतीय संघात त्याची जागा घेईल. इशान किशन हा प्रामुख्याने सलामीवीर असला तरी विश्वचषकात तो मधल्या फळीतील फलंदाजाची भूमिका बजावत आहे.  गिल बाहेर पडला तर इशान किशन रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news