टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्‍मद सिराज आणि सलामीवीर शुममन गिल यांनी जागतिक क्रमवारीत अव्‍वल स्‍थान पटकावले आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्‍मद सिराज आणि सलामीवीर शुममन गिल यांनी जागतिक क्रमवारीत अव्‍वल स्‍थान पटकावले आहे.

शुभमन गिल-मोहम्‍मद सिराज वनडेच्‍या जागतिक क्रमवारीत नंबर वन, बाबर-शाहीन ‘आऊट’

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एकदिवसीय (वनडे ) विश्‍वचषक स्‍पर्धेत टीम इंडियाच्‍या खेळाडूंनी कमाल केली आहे. सलग आठ सामने जिंकत संघाने मोठ्या दिमाखात या स्‍पर्धेतील उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे. खेळाडूच्‍या उत्‍कृष्‍ट कामगिरीचा परिणाम वनडे जागतिक क्रमवारीतही झाला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शुममन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्‍मद सिराज ( Shubman Gill & Mohammed Siraj)  यांनी जागतिक क्रमवारीत अव्‍वल स्‍थान पटकावले आहे. दोघेही वनेडतील जगातील नंबर १चे फलंदाज आणि गोलंदाज झाले आहेत. यापूर्वी पाकिस्‍तानचा कर्णधार बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी हे क्रमवारीत अग्रस्‍थानी होते. विशेष म्‍हणजे, गेली दोन वर्षांहून अधिक काळ बाबर हा वनडेमध्‍ये फलंदाजीत अग्रस्‍थानी होता.

क्रमवारीत अग्रस्‍थानी झेप घेणारा शुभमन ठरला चौथा भारतीय क्रिकेटपटू

भारताचा स्‍टार फलंदाज शुभमन गिल आज (८ नोव्हेंबर) जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा एकदिवसीय फलंदाज बनला आहे. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली नंतर वनडेच्‍या जागतिक क्रमवारीत नंबर एकचा फलंदाज बनणारा शुभमन गिल हा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
( Shubman Gill & Mohammed Siraj)

बाबर सलग दोन वर्षांहून अधिक काळ होता वनडेतील नंबर १ फलंदाज

शुभमन गिल याने पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याला मागे टाकत जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमाकांचा फलंदाज ठरला आहे. बाबरच्या ८२४ च्या तुलनेत शुभमनचे रेटिंग गुण ८३० झाले आहेत. बाबर दोन वर्षांहून अधिक काळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर 1 फलंदाज होता, पण आता गिल अखेर अव्वल स्थानावर पोहोचला आहे. 2023 त्याने वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या सहा सामन्यांमध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. ( Shubman Gill & Mohammed Siraj)

सिराजने घेतली शाहीनची जागा

गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने पाकिस्‍तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी याची जागा घेतली आहे. शाहीन गेल्या आठवड्यातच कारकिर्दीत प्रथमच जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा वनडे गोलंदाज बनला होता; परंतु न्यूझीलंडविरुद्ध खराब प्रदर्शनानंतर त्याने आपले स्थान गमावले. आता तो पाचव्‍या स्‍थानावर फेकला गेलाआहे.

Shubman & Siraj : टॉप १० मध्‍ये चार भारतीय गोलंदाज !

वनडे गोलंदाजांच्‍या क्रमवारीत सिराजसह आणखी तीन भारतीय क्रिकेटपटू आहेत. कुलदीप यादव ६६१ रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर तर जसप्रीत बुमराह 654 रेटिंग गुणांसह 8 व्या स्थानावर आहे. मोहम्मद शमी 635 गुणांसह 10 व्या स्थानावर आहे.

फलंदाजांच्या क्रमवारीत शुभमन गिल आणि बाबर आझमनंतर तिसर्‍या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक तर चौथ्‍या स्‍थानी विराट कोहली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे.

विराटचाही क्रमवारीतही झाली सुधारणा

विराट गेल्या आठवड्यात एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्मापेक्षा निच्‍चांकी   होता; पण विश्‍वचषक स्‍पर्धेत त्‍याने श्रीलंकेविरुद्ध ८८ आणि कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १०१ धावांची खेळी केली. या कामगिरीमुळे त्‍याने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विराटने यंदाच्‍या विश्वचषक स्पर्धेतील आठ सामन्यांमध्ये ५४३  धावा केल्या आहेत. या स्‍पर्धेत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. ५५० धावा करत क्विंटन डी कॉक पहिल्‍या क्रमांकावर आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news