Shubman Gill Catch : व्वा रे पठ्या! शुभमनने घेतलेला अप्रतिम कॅच पाहिलात का? (व्हिडिओ)

Shubman Gill Catch : व्वा रे पठ्या! शुभमनने घेतलेला अप्रतिम कॅच पाहिलात का? (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना धर्मशाला मैदानावर खेळवण्यात येत आहे. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यात फलंदाजी करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी आक्रमक खेळी करत पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारीकरून डावाला जोरात सुरूवात केली. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माने फिरकीपटू कुलदीप यादवला गोलंदाजीसाठी बोलावले. कुलदीपने सामन्याच्या 18 व्या षटकात बेन डकेटला शुभमनकरवी झेलबाद केले. यावेळी शुभमनने अप्रतिम झेल टिपला. (Shubman Gill Catch)

मालिकेतील अखेरच्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी डावाची सुरूवात आक्रमक डावाची सुरूवात केली. फलंदाजीमध्ये त्यांनी भारतीय वेगवान गोलंदाजांकडून धावा वसूल केल्या. इंग्लंडची आक्रमक खेळी पाहून कर्णधार रोहितने फिरकीपटू कुलदीप गोलंदाजीसाठी बोलावले. कुलदीपने केलेल्या 18 व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न करतान बेन डकेट बाद झाला. यावेळी हा झेल टिपण्यासाठी शुभमनने उलट्या दिशेला धावून अप्रतिम झेल टिपला.

ट्रॅव्हिस हेडने असाच घेतला होता रोहितचा झेल

सामन्यात शुभमन गिलने झेल टिपल्यानंतर भारतीय संघाने त्याचे अभिनंदन करत विकेटचा आनंद साजरा केला. यामुळे कुलदीप यादवच्या चेंडूवर भारताला पहिली विकेट मिळाली मिळाले. भारतात झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने असाच एक झेल पकडला होता. ज्यावर भारताचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा बाद झाला होता. (Shubhman Gill Catch)

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला 30 धावांवर शुभमन गिलच्या रूपाने पहिला धक्का बसला होता. मात्र दुसऱ्या टोकाकडून रोहित शर्मा आक्रमक खेळी करत होता. त्याने 30 चेंडूत 47 धावा केल्या होत्या. पण यानंतर रोहितने ग्लेन मॅक्सवेलच्या एका चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रॅव्हिस हेडने मागे पळून अप्रतिम झेल टिपला होता. यानंतर त्या झेलची फायनलनंतर बराच वेळ चर्चा झाली.

लंचपर्यत इंग्लंड 2 बाद 100; झॅक क्रोलीचे अर्धशतक

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना धर्मशाला येथे खेळवण्यात येत आहे. सामन्यात लंचपर्यंत फलंदाजी करताना इंग्लंडने 2 विकेट गमावून 100 धावा केल्या आहेत. बेन डकेट आणि जॅक क्रोली यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. कुलदीपने ही भागीदारी फोडत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याने डकेटला 27 धावांवर शुभमन गिलकरवी झेलबाद केले. यानंतर क्रॉलीने कसोटी कारकिर्दीतील 14वे अर्धशतक आणि भारताविरुद्ध पाचवे अर्धशतक झळकावले. यानंतर कुलदीपने ओली पोपला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी यष्टिचित करून इंग्लिश संघाला आणखी एक धक्का दिला. पोपने 11 धावा केल्या. सध्या क्राऊली 61 धावांवर नाबाद आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news