शुभांगी पाटील उद्यापासून आंदोलन करणार, म्हणाल्या विजय आपलाच…

शुभांगी पाटील
शुभांगी पाटील

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

नाशिक पदवीधर निवडणूकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. या निवडणूकीकडे अवघे राज्याचे लक्ष लागून आहे. 16 उमेदवार हे या निवडणूकीच्या रिंगणात असले तरी खरी चुरस ही अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यातच पाहायला मिळते आहे.

दरम्यान आजच्या निकालात विजय हा आपलाच असल्याचा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे. मातोश्रीवर आशिर्वाद घेऊन उद्यापासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याची भूमिका शुभांगी पाटील जाहीर केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात शुभांगी पाटील आंदोलन करणार आहे.

पदवीधर मतदारांचा कौल आपल्या बाजुने आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती, जनता याच्यात प्रचार करत होती, त्यामुळे जनतेचा विजय होणार आहे. कुणी काहीही म्हटलं तरी विजय निश्चित आहे. कारण आम्हाला माहिती आहे, मतदान किती झाले आहे याचा पूर्ण अहवाल माझ्याकडे आहे. अशी प्रतिक्रीया शुभांगी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. शुभांगी पाटील या त्र्यंबकेश्वर येथे महादेवाच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत. दरम्यान नाशिक पदवीधरच्या निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news