रोमँटिक कॉमेडी “शुभ मंगल सावधान” ची अफलातून 6 वर्ष

रोमँटिक कॉमेडी शुभ मंगल सावधान
रोमँटिक कॉमेडी शुभ मंगल सावधान

पुढारी ऑनलाईन डेस्क : आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन निर्मित "शुभ मंगल सावधान" या रोमँटिक कॉमेडीच्या रिलीजला सहा वर्षे पूर्ण झाली. 1 सप्टेंबर 2017 रोजी रिलीज झालेला हा चित्रपट आर. एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यात आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या.

या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. सोबतीने चित्रपटाच्या उत्तम कथेने प्रेक्षकांना उत्तम सिनेमा दिला. हा चित्रपट निर्भयपणे प्रेमात असलेल्या तरुण जोडप्याची गोष्ट सांगतो. अशा विषयाला विनोदी सहानुभूतीपूर्वक हाताळण्याचे निर्माता आनंद एल राय यांची कला नक्कीच उल्लेखनीय आहे.

निर्माता आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शनचे झिम्मा 2, फिर आयी हसीन दिलरुबा आणि तेरे इश्क में यासह अनेक अफलातून प्रोजेक्ट लवकरच येणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news