Shreyas Iyer : बुमराह पुनरागमनासाठी सज्‍ज, श्रेयसवर होणार शस्त्रक्रिया : बीसीसीआय

Shreyas Iyer : बुमराह पुनरागमनासाठी सज्‍ज, श्रेयसवर होणार शस्त्रक्रिया : बीसीसीआय
Published on
Updated on

पुढरी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज श्रेयस अय्यर यांच्या फिटनेसबाबत अपडेट जारी केले आहे. बीसीसीआयने शनिवारी (१५ एप्रिल) सांगितले की, बुमराहने परतण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर अय्यर यांच्यावर पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे. पाठीची यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर बुमराहने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे पुनरागमनाची तयारी सुरू केली आहे. (Shreyas Iyer)

T20 विश्वचषकात न खेळलेल्या बुमराहची या वर्षी जानेवारीत श्रीलंकेविरुद्धच्या होम वनडे मालिकेसाठी निवड झाली होती. परंतु, दुखापतीमुळे तो संघापासून लांब आहे. आयपीएलच्या१६ व्या हंगामालाही तो मुकला आहे. श्रेयस अय्यरबाबत बीसीसीआयने सांगितले की, श्रेयसच्या पाठीवर पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे. दोन आठवड्यांनंतर त्याचे एनसीएमध्ये पुनर्वसन होईल. बीसीसीआयने सांगितले की, "बुमराहने न्यूझीलंडमध्ये त्याच्या पाठीची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. तज्ज्ञांनी बुमराहला शस्त्रक्रियेनंतर सहा आठवड्यांनंतर त्याचे पुनर्वसन सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.

श्रेयस अय्यरच्या पाठीवर पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया

श्रेयस अय्यरबाबत बीसीसीआयने सांगितले की, "श्रेयस अय्यरच्या पाठीवर पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे. तो दोन आठवडे सर्जनच्या देखरेखीखाली असेल आणि नंतर पुनर्वसनासाठी NCA मध्ये परत येईल. (Shreyas Iyer)

अय्यरच्या पाठीच्या दुखापतीमुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपासून आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापासून दूर राहिला. दिल्लीतील दुसऱ्या कसोटीसाठी तो संघात परतला, त्याच दुखापतीमुळे तो चौथ्या आणि अंतिम सामन्यातून बाहेर पडला. अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळणार नाही. आता त्या सामन्यासाठी बुमराह फिट होतो की नाही हे पाहावे लागेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना ७ जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.

वर्ल्ड कपपूर्वी Jasprit Bumrah फिट होईल : बीसीसीआय

जसप्रीत बुमराह विश्वचषक संघाचा भाग नक्कीच असेल. जसप्रीत बुमराह विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त असेल, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. दुसरीकडे, माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने बुमराहच्या दुखापतीबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत, ज्यावर खुलेपणाने चर्चा झाली पाहिजे. 'स्पोर्ट्सकीडा'शी खास संवाद साधताना तो म्हणाला, 'सिस्टीममध्ये पारदर्शकता हवी. खेळाडूंना तंदुरुस्त घोषित करण्यापूर्वी त्यांचे योग्य मूल्यांकन केले पाहिजे. बुमराहचा चाहता म्हणून मला त्याची दुखापत काय आहे, त्याची रिकव्हरी वेळ काय आहे आणि बरेच प्रश्न जाणून घ्यायचे आहेत. म्हणूनच त्यांनी याबाबत माहिती द्यावी आणि नेमका मुद्दा समोर ठेवावा.'

याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता की, मला बुमराहशिवाय खेळण्याची सवय झाली आहे. रोहितच्या मते, बुमराह बऱ्याच दिवसांपासून खेळत नाही आणि भारतीय संघाने त्यानुसार जुळवून घेतले आहे.

बीसीसीआय कोणत्याही सक्रिय भारतीय खेळाडूला सौदी अरेबियातील प्रस्तावित टी-20 लीगसह जगभरातील इतर विविध टी-20 लीगमध्ये सहभागी होण्यास परवानगी न देण्याच्या धोरणावर कायम राहील. तथापि, एसए-20 आणि आंतरराष्ट्रीय लीग टी-20 सारख्या इतर स्पर्धांमध्ये फ्रँचायझी त्यांची उपस्थिती दर्शवू शकतात. दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या पुढील बैठकीत आयसीसीच्या महसूल मॉडेलवर निर्णय घेतला जाईल, परंतु तारीख अद्याप ठरलेली नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news