पुढारी ऑनलाईन: श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी जंगलात सापडलेल्या हाडांचा डीएनए आणि पॉलीग्राफ या दोन्ही टेस्टचे रिपोर्ट दिल्ली पोलिसांच्या हाती आले आहेत, अशी माहिती तपास अधिकारी सागर प्रीत हुडा यांनी माध्यमांना दिली. या अहवालामुळे श्रद्धा हत्या प्रकरणी पोलिसांना पुढील तपासात मदत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सागर प्रीत हुडा यांनी म्हटले आहे की, सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (CFSL) कडून आम्हाला श्रद्धाची जंगलात सापडलेली हाडांचा डीएनए, तिच्या वडिलांचा डीएनए रिपोर्ट आणि आफताबची घेण्यात आलेली पॉलीग्राफ टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाला आहे. हे अहवाल आम्हाला पुढील तपासात मदत करतील तिच्या फ्लॅटवर सापडलेल्या उर्वरित मृतदेहाचा भाग शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असून, याची चौकशी सुरू असल्याची माहिती हुडा यांनी दिली.
श्रद्धा हत्या प्रकरणी दिल्लीच्या जंगलात आरोपी आफताबने टाकलेले श्रद्धाच्या शरीराचे तुकडे दिल्ली पोलिसांकडून गोळा करण्यात आले होते. याप्रकरणातील मोठा खुलासा सुत्रांकडून करण्यात आला आहे. तिच्या काही हाडांचे नमुने हे तिच्या वडिलांच्या DNA शी जुळले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.