पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाला हादरवून सोडणार्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला याला घेवून जाणाऱ्या जेल व्हॅनवर सोमवारी रात्री जमावाने तलवार हल्ला केला होता. ( Attack on aftab ) या प्रकरणी कुलदीप ठाकूर आणि निगम गुर्जर या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. जाणून घेवूया तलवार हल्ल्याचा प्रयत्न करणार्या आरोपींविषयी…
पॉलीग्राफ टेस्ट करण्यासाठी सोमवारी ( दि. २८ ) आफताब पुनावाला याला फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीत (एफएसएल) आणण्यात आले होते. त्याला लॅबमधून पुन्हा तिहार कारागृहात घेवून जात असताना मधूबन चौकानजीक जमावाने जेल व्हॅनवर हल्ला केला. हल्लेखोरांनी हातात तलवार घेऊन जेल व्हॅनचा दरवाजा उघडत आफताबला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. या वेळी प्रसंगावधान राखत पोलीस कर्मचाऱ्यांनी पिस्तूल काढल्याने अनर्थ टळला. दरम्यान हल्लेखोरांनी हल्ला करताना आफताबविरोधी घोषणाबाजीही केला होती.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत कुलदीप ठाकूर आणि निगम गुर्जर या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आफताबवर हल्ला करण्यासाठी सोमवारी सकाळीच आम्ही गुरग्रामधून १५ जण दिल्लीत आलो होता. यानंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी परिसरातआम्ही रेकी केली होती, असे हल्लेखोरांनी पोलिसांना सांगितले.
हल्लेखोर कुलदीप ठाकूर हा वाहन विक्री-खरेदीचे काम करतो. तर निगम गुर्जर हा ट्रक चालक आहे. दोघेही गुरुग्राममधील हिंदू सेना शाखेतील कार्यकर्ते आहेत. हिंदू सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी कुलदीप ठाकूर आणि निगम गुर्जर यांच्या जामिनासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटलं आहे. आफताबच्या कृत्याचे हिंदू सेना कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत होता. यातूनच हा हल्ला झाला. कुटुंबातील एखादा सदस्य चूक करत असेल तर अन्य सदस्य त्याला मदत करत असतात. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहोत. आम्हाला कायद्यावर विश्वास आहे, असेही विष्णु गुप्ता यांनी सांगितले.
जेल व्हॅनवर झालेल्या हल्ल्यानंतर तिहार जेल प्रशासनाने दिल्ली पोलिसांना आफताबच्या सुरक्षेत वाढ करण्यास सांगितले आहे. यासाठी बटालियन तैनात करण्यात आली आहे. आफताबला कारगृहातून बाहेर काढताना आणि परत आणताना सुरक्षा वाढवण्यास सांगितल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :