नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीसह देशाला हादरून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या तपासात दिल्ली पोलिसांना मोठे यश आले आहे. महरोली तसेच गुरुग्रामच्या जंगलात आढळलेली मानवी हाडे ही श्रद्धाचीच असल्याची माहिती समोर आली आहे. श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनए सोबत या हाडांच्या डीएनए नमुना जुळला आहे. या नमुन्याच्या तपासासाठी सीएफएसएल ला पाठवण्यात आले होते. आफताबने श्रद्धा ची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे जंगलात फेकून दिले होते. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी जंगलातून ही हाडे हस्तगत केली होती.
दिल्ली पोलिसांना आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीचा अहवालदेखील मिळाला आहे. आरोपीच्या पॉलीग्राफ आणि नार्को टेस्ट अहवाल श्रद्धा हत्याकांडाचा तपासात महत्वाची भूमिका बजावून शकतो. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब अमीन पूनावाला याने १८ मे रोजी गळा आवळून श्रद्धाची हत्या करीत तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते. आरोपीने हे तुकडे दक्षिण दिल्लीतील विविध भागात फेकले होते. अटकेनंतर आफताब ने दिलेल्या माहितीवरून जंगलातून हे तुकडे हस्तगत करण्यात आले होते.
श्रद्धा हत्या प्रकरणातील तपासाचा एक भाग म्हणून मेहरौली जंगलातून गोळा केलेली एकूण 13 हाडे आणि जबड्याचा काही भाग ही 27 वर्षीय महिलेची असल्याचे तपासातून समोर आले होते. त्यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (सीएफएसएल) आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) या आठवड्यातच डीएनए अहवाल जाहीर करण्याची शक्यता असल्याचे देखील सूत्रांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :