पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध बांगलादेशच्या टी २० सामन्यात केएल राहुलच्या अचूक थ्रो, विराट कोहलीचे (Virat Kohli) नाबाद अर्धशतक आणि पावसाने केलेली मदत याच्या जोरावर भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने अत्यंत रोमांचक सामन्यात (IND vs BAN) बांगलादेशचा पाच धावांनी पराभव करत सेमी फायनलसाठी आगेकूच केली आहे. विजयासाठी आवश्यक 185 धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या बांगलादेशने सात षटकात बिनबाद 66 धावा केल्या होत्या. लिटन दास (Liton Das) याने 27 चेंडूत 60 धावा करत संघाला सहज विजयाकडे नेईल असे वाटत होते. परंतु, पावसाने खेळात व्यत्यय आणून सारा डावच पालटला. (Shoaib Akhtar Talks About Virat Kohli)
खेळ पूर्ववत सुरु झाल्यावर बांगलादेशला 16 षटकांत 151 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले, परंतु आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राहुलने डीप मिडविकेटवरून अचूक थ्रोवर दासला बाद केले, जो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर बांगलादेशचा संघ पत्यांप्रमाणे गडगडला आणि बांगलादेश सहा गड्यांच्या मोबदल्यात 145 धावाच करू शकला. (Shoaib Akhtar Talks About Virat Kohli)
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यावर चर्चा करताना त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, "हा विश्वचषक विराट कोहलीसाठी बनवला गेला आहे असे दिसते. त्याने धावांचा डोंगर रचला. बांगलादेशने चांगली लढत दिली. लिटन दासने चांगली सुरुवात केली. पण लिटन दासने चूक केली. पाऊस पडला. पण बांगलादेशला याचा फायदा घ्यायला पाहिजे होता, जो त्यांना घेता आला नाही. चेंडू ओला करण्याचा प्रयत्नात लिटन धावबाद झाला. याची काहीच गरज नव्हती. चेंडू बॅटवर चांगला आदळत होता, तुम्हाला तसाच खेळ पुढे चालू ठेवायचा होता. लिटन दास पहिल्यांदा पाय घसरुन पडला आणि नंतर तो धाव बाद झाला. हाच या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला." (Shoaib Akhtar Talks About Virat Kohli)
शोहेब अख्तर पुढे म्हणाला, लिटन दास खेळत राहिला असता तर बांगलादेश सहज जिंकला असता. पण, बांगलादेशने अत्यंत बालिशपणे क्रिकेट खेळले. भारताचे अभिनंदन, मी या आधीच म्हटले आहे की, भारत सेमी फायनलमधून बाहेर पडेल. हार्दिक पांड्या खूप मोठी भूमिका भारतासाठी बजावत आहे. तो आवश्यक धावा करतो आणि वेळ प्रसंगी वेकट घेऊन देतो. भारताला शुभेच्छा पण, भारत हा सामना सहज जिंकायला पाहिजे होता, तसा जिंकता आला नाही. तरीही भारताने हा सामना जिंकला आहे. पण, भारताने वर्ल्ड कप जिंकेल का? तर येणारा काळच याचे उत्तर देईल.
प्लेअर ऑफ द मॅच ठरलेल्या कोहलीने 44 चेंडूत नाबाद 64 धावा आणि राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 6 बाद 184 धावा केल्या होत्या. भारताचे आता चार सामन्यामध्ये मिळून सहा गुण झाले आहेत आणि शेवटच्या चारमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना रविवारी शेवटच्या सामन्यात (IND vs ZIM) झिम्बाब्वेला पराभूत करावे लागेल.
अधिक वाचा :