MP Election Results | मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण? शिवराज सिंह चौहान यांचा मोठा खुलासा

MP Election Results | मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण? शिवराज सिंह चौहान यांचा मोठा खुलासा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : भाजपने मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल हे निवडणुकीदरम्यान जाहीर केले नव्हते. भाजपने पीएम मोदींचा चेहरा पुढे करत ही निवडणूक जिंकली. पण, आता मुख्यमंत्रीपदासाठी शिवराज सिंह चौहान, नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल, कैलाश विजयवर्गीय आणि प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यातील कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद सिंह पटेल यांच्यासह अनेक बडे नेते दिल्लीत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशात लवकरच भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली जाऊ शकते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. (MP Election Results)

संबंधित बातम्या 

दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठा खुलासा केला आहे. "…मी आधीही मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो आणि आताही नाही. मी फक्त पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्ष जे काही पद अथवा जबाबदारी देईल ते मी पूर्ण करेन…." असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.

"मी दिल्लीला जाणार नाही. उद्या छिंदवाडा येथे जाईन जिथे विधानसभेच्या सर्व ७ जागा आम्हाला जिंकता आल्या नाहीत. माझा एकच ठराव आहे, भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील सर्व २९ जागा जिंकाव्यात…" असेही त्यांनी नमूद केले आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशात भाजपला मिळालेल्या दोन तृतीयांश बहुमतामुळे शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. कैलाश विजयवर्गीय यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, ज्योतिरादित्य शिंदे आणि नरेंद्र सिंह तोमर यांसारखे मोठे नेतेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. (MP Election Results)

मध्य प्रदेशात यूपी फॉर्म्युला

एका वृत्तानुसार, भाजप मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमफॉर्म्युधील फॉर्म्युल्यावरही विचार करू शकते. मध्य प्रदेशात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रीही असू शकतात, अशी चर्चा आहे. तीन महत्त्वाच्या पदांच्या माध्यमातून भाजप मध्य प्रदेशात जातीय आणि प्रादेशिक समीकरणे जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. मध्य प्रदेशात भाजपला विंध्य आणि मालवा-निमाड भागात दणदणीत विजय मिळाला आहे. अशा स्थितीत या क्षेत्रांना मोठे प्रतिनिधित्व मिळू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news