शिवाजीनगर येथे रेकॉर्डरूमला लागलेल्या आगीत कागदपत्रे खाक

शिवाजीनगर येथे रेकॉर्डरूमला लागलेल्या आगीत कागदपत्रे खाक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर येथे महापालिका इमारतीच्या शेजारी बी यु भंडारी यांच्या वोक्स वॅगनच्या शोरूम बाहेर एक व्यावसायिक इमारतीतील तळमजल्यात लागलेल्या आगीत महत्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विझवल्याने 25 टक्के महत्वपूर्ण कागदपत्रे वाचली. यावेळी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी सांगितले, शिवाजी नगर येथील महापालिका इमारतीच्या शेजारी बी यु भंडारी यांच्या वोक्स वॅगनच्या शोरूम बाहेर एक व्यावसायिक इमारतीतील टाळमजल्यात आग लागल्याचा कॉल अग्निशमन दलाला पहाटे पाच वाजता मिळाला होता. तेथे गेल्यानंतर तळ मजल्यावर असणारे रेकॉर्डरूम ला आग लागली होती.

तीन हजार स्केअर फुटात ही रेकॉर्डरूम आहे. जयेश शहा यांच्या मालकीची ती इमारत आहे. त्यांची पहिली विद्युत मोटर म्हणून कंपनी होती. ती बंद झाल्यानंतर त्याची जी कागदपत्रे होती ती या तळ मजल्यावरील रेकॉर्डरूम मध्ये ठेवली होती. तेथे गेल्यानंतर पहिले तर खूप मोठया प्रमाणावर धूर झाला होता. सुरवातीला कसबा फायर स्टेशनची गाडी घटनास्थळी दाखल झाली.

नंतर नायडू फायर स्टेशन ची गाडी दाखल झाली. आग मोठी असल्याने मुख्य अग्निशमन केंद्रातून एक फायर इंजिन दोन टँकर मागविण्यात आले. धूर मोठयप्रमाणावर असल्याने धूर बाहेर काढला. नंतर पी ए सेट घालून दोन जवानांना आत पाठवले. यावेळी पाण्याच्या चार लाईन तयार करून पाण्याचा मारा करून आग अर्ध्या तासात आटोक्यात आणली. एका तासात आग पूर्णपणे विझवली. यावेळी येथील बहुतांश कागदपत्रे जळून खाक झाली

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news