Shivaji Park Deepotsav : “माझ्या शिवाजीपार्क शेजाऱ्यांनो;” राज ठाकरेंचा दीपोत्सव साजरा होणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित

Shivaji Park Deepotsav
Shivaji Park Deepotsav
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : निमंत्रण दीपोत्सवाचं…. आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. शिवाजी पार्कवरील आपल्या दीपोत्सवाला तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा. असं ट्विट करत एक पत्र लिहंल आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी. त्यांनी या पत्रातून दीपोत्सवाचं निमंत्रण (Shivaji Park Deepotsav) दिलं आहे.

Shivaji Park Deepotsav : गेल्या १० वर्षापासून  शिवतीर्थ परिसरात दीपोत्सव

माझ्या शिवाजीपार्क शेजाऱ्यांनो, 

तसंच समस्त दादरकर आणि मुंबईकर जनहो, सस्नेह जय महाराष्ट्र!

दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. गेली काही वर्ष कोरोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती, परंतु यावेळेस दिवाळीच्या निमित्ताने वातावरणात पुन्हा उत्साह, आनंद दिसतोय. दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई, म्हणजेच दीपोत्सव' हे गेल्या १० वर्षापासून जणू समीकरणच बनलं आहे. दरवर्षी आपण शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करतो. कोरोनाच्या २ वर्षात सुद्धा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या दीपोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे.

दीपावलीच्या निमित्ताने आपण आपलं घर, आपलं अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळवून टाकतो. दादरमधील हा शिवतीर्थाचा परिसर, हे मी माझ्या घराचं अंगणच समजतो, म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं विविध रंगी लखलखणान्या दिव्यांच्या रोषणाईनं आणि इतर सजावटीनं आपण उजळवून टाकणार आहोत. मला तर वाटतं की प्रत्येकानं आपल्या घराबरोबर आपलं अंगण आणि आपला परिसर असाच सुंदर ठेवला तर महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा होईल. हे करण्यामागेही माझी तीच भावना आहे.

वसुबारसेपासून, २१ ऑक्टोबर २०२२ पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत, ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत, हा दीपोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी वसुबारसेला म्हणजे २१ ऑक्टोबरला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत. आपण अवश्य यावे, आपल्या कुटुंबातील सर्वांना घेऊन या. मित्र मंडळींना सांगा. आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा. आपल्या सर्वांचा, राज ठाकरे

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news