पुणे : पुढारी वृत्तसेवा : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या क्रीडामहर्षी, मार्गदर्शक आणि खेळाडूंना 'शिवछत्रपती' राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात 2019-20, 2020-21, 2021-22 या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील 28 खेळाडूंचा समावेश आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 2019-20 चा खो-खोचे मार्गदर्शक शिरीन गोडबोले, थेट पुरस्कार कुस्तीचे मार्गदर्शक अमरसिंह निंबाळकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
2020-21 या वर्षासाठी जिम्नॅस्टिक्सचे मार्गदर्शक संजोग शिवराम ढोले, स्केटिंगचे राहुल रमेश राणे यांचा समावेश आहे. 2019-20 या वर्षाच्या शिवछत्रपती पुरस्कारामध्ये अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडू पारस सुनील पाटील, अंकिता सुनील गोसावी, खो-खो क्रीडा प्रकारातील खेळाडू किरण किरणवाईकर, स्केटिंगचे अरहंत राजेंद्र जोशी, श्रुतिका जयकांत सरोदे, सॉप्टबॉलचे हर्षदा रमेश कासार, जलतरणपट्टू मिहिर राजेंद्र आंब्रे, साध्वी गोपाळधुरी, कुस्तीपट्टू सोनबा तानाजी गोंगाणे यांना जाहीर झाला आहे.
2020-21 या वर्षाच्या पुरस्कारात बेसबॉल रेश्मा शिवाजी पुणेकर, वुशूमध्ये मीताली मिलिंद वाणी, सायकलिंग क्रीडा प्रकारात सूर्या रमेश थटू, स्केटिंगमधील अथर्व अतुल कुलकर्णी, कॅरम प्रकारात अनिल दिलीप मुंढे, कुस्तीमध्ये सूरज राजकुमार कोकाटे आणि कोमल भगवान गोळे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. 2021-22 या वर्षासाठी शरीरसौष्ठव क्रीडा प्रकारात राजेश सुरेश इरले, कनोईंग व कयाकिंगचे देवेंद्र शशिकांत सुर्वे, लॉन टेनिसमधील अर्जुन जयंत कढे, खो-खोतील अक्षय प्रशांत गणपुले, स्केटिंगमधील यश विनय चिनावले, क्लायबिंगमधील ऋतिक सावळाराम मारणे आणि कुस्तीमधील हर्षवर्धन मुकेश सदगीर यांना जाहीर झाला आहे.
हेही वाचा :