shiv sena vs ncp nashik : शिवसेना स्टाईलला राष्ट्रवादी देखील ठोस उत्तर देऊ शकते

shiv sena vs ncp nashik : शिवसेना स्टाईलला राष्ट्रवादी देखील ठोस उत्तर देऊ शकते

shiv sena vs ncp nashik : शिवसेना स्टाईलला राष्ट्रवादी देखील ठोस प्रत्युत्तर देऊ शकतो. पण आमच्या नेत्यांनी आम्हाला सुसंस्कृतता शिकवली आहे. धुडगूस घालायला नाही. त्यामुळे आम्ही संयम ठेवतो. पण कोणी अंगावर आले तर शिंगावर घ्यायला देखील तेवढेच तत्पर आहोत. हिंमत असेल तर कार्यक्रमात खो घालुन बघाच. राष्ट्रवादीने काही बांगड्या भरलेल्या नाहीत, असे जाहीर आव्हान आमदार सरोज अहिरे यांनी माजी आमदार योगेश घोलप यांना पत्रकार परिषदेत दिले.

देवळाली येथील संपर्क कार्यालयात शुक्रवारी ( दी .८ ) पत्रकात परिषद झाली. त्यावेळी आमदार सरोज अहिरे यांनी माजी आमदार योगेश घोलप यांच्या आरोपांना उत्तर देताना आपली भुमिका मांडली. आमदार सरोज अहिरे यांनी यावेळी सांगितले की,स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुकटचे श्रेय लाटणारी नाही. मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरू आहे. माजी आमदार योगेश घोलप यांना ते सहन होत नाही. त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकु लागली आहे. त्यामुळे ते असे बिनबुडीचे आरोप करीत आहे.

महाविकास आघाडीचा धर्म राष्ट्रवादी प्रामाणिकपणे पाळत आहे. माजी आमदार योगेश घोलप यांनी देखील तो पाळायला हवा. त्यांच्या कार्यकाळात कामे मंजूर झाली असे त्यांचा दावा आहे. तर माग कामची वर्क ऑर्डर का निघाली नाही. उगाच चुकीचे कागदपत्रे दाखवत जनतेची दिशाभूल करु नये. जनतेला सर्वकाही समजते. याचे भान माजी आमदार घोलप यांनी ठेवायला हवे.

shiv sena vs ncp nashik : घरी बसून अभ्यास करा

माजी आमदार योगेश घोलप यांना जनतेने घरी का बसविले. त्याचा विचार त्यांनीच करायचा हवा. ३० वर्ष तुमच्याकडे सत्ता होती. मंत्री पद होते. मग मतदार संघ ऐवढा भकास कसा ? इतर आजी – माजी मत्र्यांचे मतदार संघ बघा कसा विकसित दिसतो. माजी आमदार योगेश घोलप यांना जनतेने सद्या घरी बसविले आहे. त्यांनी त्याचा विचार करावा, योग्य की अयोग्य काय ? हे ठरविण्यासठी मतदारांनी त्यांना भरपूर वेळ दिलेला आहे. त्याचा सदुपयोग त्यांनी करावा.असे आमदार अहिरे यांनी म्हटले.

खासदार – आमदार यांच्यात लढाई नको

खासदार हेमंत गोडसे हे संयमी, शांत नेते आहे.त्यांच्या विषयी माझ्या मनात कोणताही किंतू परंतू नाही. नासाका सुरू करण्यासाठी ते देखील प्रयत्न करीत आहे. त्यांना माझा विरोध नाही. उलट पाठिंबाच आहे. माजी आमदार घोलप यांनी उगाच खासदार गोडसे आणि माझ्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नये. त्याने काहीएक साध्य होणार नसल्याचे अहिरे यांनी स्पष्टपणे सांगीतले.

त्रास देणे थांबवायला हवे

नगरसेवक झाल्यापासून घोलप कुटुंब मला त्रास देत आहे. आता तर जनतेने मला आमदार केले आहे. त्यामुळे त्यांच्या त्रासात अधिक भर पडली आहे. पण मी खंबीरपणे उभी राहिले आहे. त्यांना जी भाषा समजते. त्याच भाषेत उत्तर देईल. असे आमदार अहिरे यांनी सांगीतले.

नासाकाचे एखादे पत्र दाखवा

घोलप कुटुंबाकडे दीर्घकाळ सत्ता होती. त्यांनी बंद पडलेला नासाका सुरू करण्यासाठी कोणत्या बैठका घेतल्या. कुठला पत्रव्यवहार केला. सहकार मंत्र्यांना कधी भेटले. भाजप सोबत ते सत्तेत होते. मग प्रयत्न केल्याचा एखादा पुरावा त्यानी दाखवायला हवा. आमदार झाल्याच्या पहिल्या दिवसापासून नासाका सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. शेवटपर्यंत करीत राहील. यश येईल की अपयश हा नंतरचा भाग असल्याचे आमदार अहिरे यांनी सांगीतले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news