ठाकरेंची परवानगी घेऊन शिंदे गटात जातोय, अर्जुन खोतकर यांनी डोळ्यात अश्रू आणून जाहीर केला निर्णय

Arjun Khotakar
Arjun Khotakar
Published on
Updated on

जालना; पुढारी ऑनलाईन : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आज शिंदे गटात जात असल्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगत अडचणीत असाल तर निर्णय घेऊ शकता, अशी त्यांनी परवानगी दिल्याचे खोतकर यांनी आज जालन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. परिस्थितीनुसार हा निर्णय घ्यावा लागत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी समर्थन करत असल्याचे खोतकर यांनी डोळ्यात अश्रू आणून जाहीर केले.

मी निर्णय घेण्याआधी ठाकरेंशीही माझ्यावर बेतलेली परिस्थिती बोलून दाखवली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण शिंदे गटाचे समर्थन करत असल्याचे खोतकर यांनी आज सांगितले. माझ्यावर ओढवलेल्या परिस्थितीनेच मला शिंदेंना समर्थन द्यावे लागत असल्याची खदखद त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जबाबदारी दिल्याबद्दल मी पक्षनेतृत्त्वाचे मी आभार मानतो. शेतकऱ्यांसाठी कारखाना सुरू केला. बँकेंकडून कर्ज घेत साखर कारखान्यात गुंतवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना नेते अर्जुन खोतकर येत्या ३१ जुलैला सिल्लोड मध्ये आयोजित भव्य मेळाव्यातून शिंदे गटात प्रवेश करतील,असा दावा शुक्रवारी अब्दुल सत्तार यांनी केला होता. गेल्या काही दिवसांपासून खोतकर यांचा दिल्लीत मुक्काम होता. खोतकरांचा शिंदे गटातील प्रवेश निश्चित करण्यासाठी सत्तार यांनी त्यांची भेट घेत मनधरणी केली होती.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतरच एकनाथ शिंदे गटात जायचे की नाही? याचा निर्णय घेऊ अशी सावध प्रतिक्रिया खोतकरांनी याआधी दिली होती. त्यानंतर ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आज आपला निर्णय जाहीर केला.

अर्जुन खोतकर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) याधी जोरदार झटका दिला होता. जालना सहकारी साखर कारखान्याची तब्बल 78.38 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. कारखान्याची जालना जिल्ह्यातील सावरगाव हडत येथील 200 एकरपेक्षा जास्त जमीन, कारखान्याची इमारत, प्लांट आणि यंत्रसामग्री अशा मालमत्तेचा यात समावेश आहे. जालना सहकारी साखर कारखान्याची ही मालमत्ता सध्या अर्जुन शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि.च्या नावावर आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात पीएमएलए कायद्याअंतर्गत ही कारवाई केली होती. त्यामुळे खोतकर अडचणीत आले होते.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news