Prakash Ambedkar : शिंदे दोन महिन्यांनंतर दिसणार नाहीत : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान मोदी यांनी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय व इतर यंत्रणाचा वापर करुन १६ हजार कोटींचे इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून कमाई केली आहे. येथील महायुतीचा उमेदवार शिंदे गटाचा आहे. परंतु, शिंदे हेच दोन महिन्यानंतर दिसणार नाहीत, असा दावा वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. Prakash Ambedkar

हिंगोली येथील इंदिरा गांधी चौकाशेजारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आंबेडकर यांची आज (दि.१६) पाच वाजता सभा पार पडली. Prakash Ambedkar

यावेळी ते म्हणाले की,  मोदी गॅरंटी हा नारा सध्या भाजपकडून दिला जात आहे. स्वतःचे कुटुंब सांभाळू शकत नसलेला माणूस गॅरंटी देऊ शकत नाही. भारतातील सतरा लाख कुटुंबियांनी मोदी सरकारच्या काळात नागरिकत्व सोडले आहे. राज्यसभेत याचे दाखले आहेत. यामुळे मोदी कुठल्या तोंडाने मते मागीत आहेत. हिंदू कुटूंब देश सोडून जात असताना हिंदुत्वाच्या नावावर मत मागणे कितपत योग्य आहे, असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला.

सभेत उपस्थित जनतेला त्यांनी येथे वसुली करणारा कुणी आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी एका शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधीचे नाव सभेतील लोकांनी घेतल्यानंतर तो भुरटा चोर आहे. परंतु, खरा डाकू दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयात बसला आहे, असा निशाणा त्यांनी साधला. येथील डाकू वेगवेगळ्या यंत्रणाचा धाक दाखवून १६ हजार कोटींची वसुली करीत आहे. हे सरकार भांडवलदारांचे सरकार आहे. देशाचा नकाशा बदलणारी व्यक्ती पंतप्रधानपदी योग्य आहे का? असा सवालही त्यांनी केला.

चॉयनाच्या कंपनीला इलेक्ट्रोल बॉन्ड दिल्यामुळे चॉयना छाताडावर बसला आहे. यासाठी नरोबा, कुंजरोबा, असा पंतप्रधान नको आहे. गोधरानंतर मणीपूरमध्ये अत्याचार झाले. आता हे सरकार पुन्हा आल्यास देशाचा नकाशाच बदलेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यास मोदी कुचकामी ठरले आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news