![Sukhee collection : ‘सुखी’ ची इतकी कमाई? शिल्पाच्या अभिनयाची वाहव्वा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F09%2F%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा कायम तिच्या ग्लॅमरस अंदाजात बघायला मिळते. फक्त फॅशन नाही त्या पलीकडे जाऊन अभिनयाचं करिष्मा ती कायम दाखवत असते. 'सुखी' चित्रपटामधून पुन्हा एकदा शिल्पाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. प्रत्येक स्त्रीमध्ये लपलेल्या 'सुखी' ची गोष्ट प्रेक्षकांना भावली आणि शिल्पाने रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा आपली छाप सोडली आहे. रिलीज झाल्यानंतर दोन दिवसांत ७० लाखाची कमाई या चित्रपटाने केली. तर आठवड्याच्या शेवटी शनिवारी ४० लाखाची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. ( Sukhee collection )
संबधित बातम्या
बॉलिवूड दिवा असलेल्या शिल्पाने 'सुखी' चित्रपटातील तिच्या उल्लेखनीय अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा आश्चर्यचकित केले आहे. 'सुखी'मध्ये शिल्पा शेट्टी कुंद्राने एक व्यक्तिरेखा साकारली आहे, जी स्वतःच्या प्रेमाच्या प्रवासाला सुरुवात करते. ती तिच्या व्यक्तिरेखेच्या जीवनातील विविध टप्प्यांमध्ये अखंडपणे पार पाडते.
'सुखी' या सोनल जोशी दिग्दर्शित आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि शिखा शर्मा यांचा समावेश असलेल्या पॉवरहाऊस टीमने निर्मिती केली आहे. मुख्य भूमिकेत शिल्पा शेट्टी कुंद्रासोबत चित्रपटात अमित साध, चैतन्य चौधरी, किरण कुमार, कुशा कपिला यांसारखे प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे.
शिल्पा शेट्टी कुंद्राच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाल्यास, ती रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' मधील पहिल्या महिला पोलिसाच्या भूमिकेत आणि 'KD' नावाचा कन्नड चित्रपटात दिसणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता सिगेला पोहोचली आहे. ( Sukhee collection )
हेही वाचा :