पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिका विरूध्दच्या वन डे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा शिखर धवन याला साेपवली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती 'एएनआय' वृत्तसंस्थेने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) हवाल्याने दिली आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना विश्रांती देण्यात येईल.( IND vs SA ODIs ) यामुळे शिखर धवनवरच टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदार साेपवली जाईल, असे मानले जात आहे.
ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडिया २८ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिका विरूध्द तीन टी-20 आणि तीन वन डे सामने खेळणार आहे. पहिला टी-20 सामना थिरुअनंतपुरममध्ये तर दुसरा २ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी आणि तिसरा सामना इंदौरमध्ये होणार आहे. वन डे मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी लखनौ येथे होईल. दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे ९ आणि ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दौर्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. यापूर्वीही लक्ष्मण यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षणपदाची धुरा संभाळली आहे.
शिखर धवन याने यापूर्वीही भारतीय क्रिकेट संघाची कर्णधारपदाची धुरा संभाळली आहे. मागील वर्षी श्रीलंकामध्ये झालेल्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी शिखरच कर्णधार होता. यानंतर वेस्टइंडिज विरूध्दच्या वन डे मालिकेसाठीही त्याने टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला होता. झिम्बाव्वे विरूध्दच्या मालिकेतही त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने निर्विवाद विजय मिळवला होता.
हेही वाचा :