Shikhar Dhawan Divorce with Ayesha Mukherjee | शिखर धवनला घटस्फोट मंजूर, पत्नी आयशाने केलेला मानसिक छळ ठरले कारण

Shikhar Dhawan Divorce with Ayesha Mukherjee | शिखर धवनला घटस्फोट मंजूर, पत्नी आयशाने केलेला मानसिक छळ ठरले कारण

पुढारी ऑनलाईन : भारताचा सलामीवीर शिखर धवन याचा त्याची पत्नी आयशा मुखर्जी हिच्याशी घटस्फोट झाला आहे. या दोघांच्या घटस्फोटाला दिल्लीतील पटियाला हाऊस येथील कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली आहे. शिखर धवनच्या पत्नीने धवनला त्याच्या एकुलत्या एक मुलापासून अनेक वर्षे वेगळे राहण्यास भाग पाडून मानसिक छळ केल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. (Shikhar Dhawan Divorce with Ayesha Mukherjee)

संबंधित बातम्या 

कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश हरीश कुमार यांनी घटस्फोटाच्या याचिकेत शिखर धवनने पत्नीवर जे काही आरोप केलेले ते सर्व आरोप मान्य केले. धवनच्या पत्नीने तिच्यावर झालेल्या आरोपांवर विरोध केला नाही. तसेच ती स्वतःचा बचाव करण्यात अपयशी ठरली, असे कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

धवन आणि आयशा यांनी २०१२ मध्ये लग्न केले होते. त्यांना १० वर्षांचा मुलगा असून त्याचे नाव झोरावर धवन असे आहे. आयशा आणि झोरावर हे दोघेही ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत. आयशा आधी विवाहित होती आणि तिला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत.

त्यांच्या मुलाचा कायमस्वरूपी ताबा घेण्याबाबत न्यायालयाने कोणताही आदेश देण्यास नकार दिला. पण, न्यायालयाने धवनला त्याच्या मुलाला भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये योग्यवेळी भेटण्यासाठी आणि व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी चॅट करण्याची परवानगी दिली.

न्यायालयाने आयशाला शाळेच्या सुट्टीच्या अर्ध्या कालावधीत धवन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एक दिवस राहण्यासाठी मुलाला भेटीसाठी भारतात आणण्याचे आदेश दिले आहेत.

धवनच्या याचिकेनुसार, पत्नीने सुरुवातीला ती त्याच्यासोबत भारतात राहणार असल्याचे सांगितले होते. पण, तिच्या माजी पतीशी असलेल्या वचनबद्धतेमुळे ती असे करण्यात अयशस्वी ठरली, ज्याच्यासोबत तिला दोन मुली आहेत. पत्नी आयशाने तिच्या माजी पतीला ऑस्ट्रेलिया सोडणार नसल्याचे वचन दिले होते, जिथे ती सध्या तिच्या दोन मुली आणि धवनच्या एका मुलासह राहते. (Shikhar Dhawan Divorce with Ayesha Mukherjee)

"स्वतःचा कोणताही दोष नसताना त्याला (धवन) अनेक वर्षे पोटच्या मुलापासून दूर राहण्याच्या अपार यातना आणि मनस्ताप सहन करावा लागला. पत्नीने आरोप नाकारले असले तरी, तिला त्याच्यासोबत भारतात रहायचे होते. तिच्या आधीच्या लग्नापासून तिच्या मुलींशी असलेल्या बांधिलकीमुळे तिला ऑस्ट्रेलियात राहावे लागले. ती भारतात राहायला येऊ शकली नाही. तिने खटला लढवण्याचा निर्णय घेतला नाही," असे न्यायाधीशांनी नमूद केले. (shikhar dhawan wife divorce)

"यातून हे सिद्ध होते की पत्नी लग्नानंतर भारतात वैवाहिक जीवन व्यथित करण्याचे आश्वासन पाळू शकली नाही आणि त्याला (धवन) वर्षानुवर्षे स्वतःच्या मुलापासून वेगळे राहण्याच्या प्रचंड यातना आणि मनस्ताप सहन करावा लागला." असे न्यायालयाने म्हटले आहे. (shikhar dhawan wife divorce)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news