![काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरुर. ( संग्रहित छायाचित्र)](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2Fshashi-tharur.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क: "मी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या वाढदिवासाच्या पार्टीला उपस्थित होता. यामध्ये त्यांच्या बहिणीसह सुमारे १५ लोक उपस्थित होते. महुआ मोईत्रा माझ्यापेक्षा २० वर्षांनी लहान आहेत. माझ्यासाठी ती मुलीसारखी आहे. मात्र वाढदिवसाच्या कार्यकम्रात काढलेले फोटो क्रॉप करुन मला ट्रोल केले जात आहे. हे अत्यंत हीन दर्जाचे राजकारण आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरुर ( Shashi Tharoor ) यांनी ट्रोल करणार्यांना सुनावले आहे.
थरुर यांनी म्हटले आहे की, महुआ मोईत्रा यांच्या वाढदिवसा निमित्त पार्टी होती. यामध्ये १५ लोक उपस्थित होते. मात्र संपूर्ण फोटो दाखवण्याऐवजी क्रॉप केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.ही एक खाजगी भेट होती अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे; पण मी अशा ट्रोलला महत्त्व देत नाही. मी लोकांसाठी काम करण्यात व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपच्या ट्रोल आर्मीने सोशल मीडियावर काही वैयक्तिक फोटो प्रसारित केले आहेत हे पाहून मला खूप आनंद झाला, असे तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोईत्रा यांनी यापूर्वी सांगितले होते. "मला पांढऱ्या ब्लाउजपेक्षा हिरवा ड्रेस जास्त आवडतो," असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले हाेते.
हेही वाचा :