Share Market Today | अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीचे शेअर बाजारात पडसाद, सेन्सेक्स घसरला, रुपया निचांकी पातळीवर

Share Market Today | अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीचे शेअर बाजारात पडसाद, सेन्सेक्स घसरला, रुपया निचांकी पातळीवर
Published on
Updated on

Share Market Today : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी ७५ बेसिस पॉईंटने व्याजदर वाढवल्यानंतर आणि आणखी मोठ्या व्याजदर वाढीचे संकेत दिल्यानंतर त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले. बाजार खुला होताच गुरुवारी सेन्सेक्स सुमारे ३०० अंकांनी घसरुन ६० हजारांच्या खाली येऊन व्यवहार करत आहे. तर निफ्टीही १७.६५० च्या खाली येऊन व्यवहार करत आहे. आशियाई बाजारातील समभागांनीदेखील दोन वर्षांच्या निचांकी पातळी गाठली आहे. (Share Market Today)

रुपयाची निचांकी पातळीवर घसरण

अमेकिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी ७५ बेसिस पॉईंटने व्याजदर वाढवल्यानंतर गुरुवारी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत निचांकी पातळीवर पोहोचला. सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया ८०.४५ च्या आसपास खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात रुपयाची झालेली घसरण ही ०.३९ टक्के आहे. काल बुधवारी रुपया ७९.९७ वर बंद झाला होता.

कच्च्या तेलाच्या दरात घसरण

वाढत्या इंधनाच्या मागणीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल या भीतीने महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात लक्षणीय वाढ केली. यामुळे गुरुवारी सुरुवातीला आशियातील व्यवहारात तेलाच्या किमती कमी झाल्या. कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ८९.६७ डॉलरवर आला आहे.

वाढत्या महागाईला रोखण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने (Us Fed Interest Rate) पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केली आहे. व्याजदरात ०.७५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरॉम पॉवेल यांनी जाहीर केला.

वाढत्या महागाईमुळे जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदरात वाढ करत असल्याचे चित्र आहे. फेडलर रिझर्व्हने (Us Fed Interest Rate) यापूर्वी व्याजदर ७५ बेसिक पॉईंटने वाढवले होते. अमेरिकेतील महागाई २ टक्केपर्यंत नियंत्रणात ठेवण्याचे उद्दिष्ट फेडरल रिझर्व्हने ठेवले आहे. पण अमेरिकेत ऑगस्ट महिन्यात महागाईचा निर्देशांक ८.३ टक्के इतका होता.

अमेरिकेतील व्याजदरांचा परिणाम जगभरातील गुंतवणुकीवर होतो, त्यामुळे अनेक देशांचे याकडे लक्ष लागून राहिलेले होते. तर जागतिक बँकेने जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवत असल्याने त्याचा परिणाम जागतिक जीडीपवर होऊन जगभरात मंदी येऊ शकते, असा इशारा यापूर्वीच दिलेला आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवल्याचे पडसाद यापूर्वी जगभरातील शेअर बाजरात उमटले होते. (Us Fed Interest Rate)

भारतीय रिझर्व्ह बँकेची २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान मॉनेटरी पॉलिसीशी संबधीत बैठक पार पडणार आहे. अमेरिकेने वाढवलेल्या व्याजदरामुळे भारतीय रिझर्व्ह बँकदेखील आपल्या व्याज दरात वाढ करण्याची शक्यात निर्माण झाली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news