रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे शरद पवारांना निमंत्रण, ट्रस्टला दिले ‘हे’ उत्तर

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे शरद पवारांना निमंत्रण, ट्रस्टला दिले ‘हे’ उत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क: अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशभरात धामधुम सुरू आहे. मंगळवार १६ जानेवारीपासून अयोध्येतील राम मंदिर परिसरात अनेक धार्मिक विधींना सुरूवात झाली आहे. या सोहळ्याचे निमंत्रण राज्यातील ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देण्यात आले आहे; परंतु शरद पवार यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला पत्र लिहून उपस्थिती संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांनी सोमवारी २२ जानेवारीच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे, मात्र सोहळा पूर्ण झाल्यानंतर दर्शनासाठी येईन, असेही त्‍यांनी पत्रात नमूद केले आहे. (Sharad Pawar On Ram Temple Ceremony)

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे; परंतु शरद पवार यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात शरद पवार यांनी म्हटले आहे की, सोमवार २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर मी मोकळेपणाने वेळ काढून दर्शनासाठी येईन. तोपर्यंत राम मंदिराचे बांधकामही पूर्ण होईल, असे त्यांनी म्हटले आहे. (Sharad Pawar On Ram Temple Ceremony)

तुमच्या स्नेहपूर्ण निमंत्रणासाठी मी ह्दयपूर्वक आभार मानतो

मर्यादा पुरूषोत्तम श्री राम हे भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यावधी रामभक्तांच्या श्रद्धा आणि आस्थेचे प्रतिक आहे. अयोध्येच्या सोहळ्याबद्दल रामभक्तांमध्ये उत्सुकता आणि अतुरता देखील असून, ते मोठ्या प्रमाणात अयोध्येत दाखल होत आहेत. या माध्यमातून ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद माझ्यापर्यंत पोहचेल. त्यामुळे तुमच्या स्नेहपूर्ण निमंत्रणासाठी मी ह्दयपूर्वक आभार मानतो. सोहळ्याच्या यशासाठी माझ्या शुभेच्छांचा स्वीकार करावा, असेही पवार यांनी पत्रात म्हटले आहे. (Sharad Pawar On Ram Temple Ceremony)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news