Ayodhya Ram Temple : सोन्या, चांदी, हिर्‍यांचे प्रती अयोध्या राम मंदिर | पुढारी

Ayodhya Ram Temple : सोन्या, चांदी, हिर्‍यांचे प्रती अयोध्या राम मंदिर

वाराणसी : गुलाबी मीनाकारी कलाप्रकारात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित वाराणसी येथेल हस्तशिल्पकार कुंज बिहारी यांनी सोने, चांदी आणि हिर्‍यांच्या माध्यमातून 108 दिवसांच्या अथक परिश्रमांनी श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. प्रतिकृती 2.5 किलो वजनाची असून, 12 इंच उंच, 8 इंच रुंद आणि 12 इंच लांबीची आहे. मंदिरातील रामाची मूर्ती सोन्याची आहे.

आग्रा येथून आले पेठे

अयोध्या : जगभरातून रामलल्लासाठी भेटी पाठविल्या जात आहेत. ताजनगर, आग्रा येथून 56 वेगवेगळ्या स्वादांतील 560 किलो पेठेही अयोध्येत दाखल झाले आहेत.

Back to top button