सांगली : पूर्वी लोक टीव्हीवर संजय राऊत यांना ऐकायचे आता बंद करतात – शंभूराज देसाई

सांगली : पूर्वी लोक टीव्हीवर संजय राऊत यांना ऐकायचे आता बंद करतात – शंभूराज देसाई

विटा (सांगली) पुढारी वृत्तसेवा : संजय राऊत सकाळी मुलाखत घेतात, त्यावेळी किती जण टीव्ही बघतात याचा एकदा सर्व्हे माध्यमांनीच करावा. मी अनुभव घेतलाय. पूर्वी लोक त्यांना ऐकायचे आता बंद करतात. त्यामुळे त्यांची दखल सुद्धा घ्यायची गरज नाही अशा शब्दांत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा मंगळवारी ( ७ फेब्रुवारी ) रोजी अपघाती मृत्यू झाला. राजापूर येथे पेट्रोल पंपावर एका 'थार' गाडीनं त्यांच्या दुचाकी वाहनला जोरात धडक दिली. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधितावर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा अपघाती मृत्यू नसून घातपात आहे, असा आरोप पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. शिवाय याचा संबंध थेट रिफायनरीसंदर्भातील एका बातमीशी आहे असा दावा वारिसे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप सत्र सुरू झालेले आहे.
याबाबत विरोधकांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे म्हटले आहे.

आंगणेवाडी येथील यात्रेत जाहीर कार्यक्रमामध्ये भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरीच्या विरोधकांना धमक्या दिल्या होत्या. रिफायनरी करून दाखवतो आणि कोण आडवा येतोय ते पाहतो, अशा प्रकारची भाषा केली आणि दुसऱ्याच दिवशी शशिकांत वारीसे यांची हत्या झाली. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. २४ तासापूर्वी रिफायनरीला विरोध करणाऱ्यांना धमक्या दिल्या जातात आणि पुढच्या तासात एक पत्रकार मारला जातो, याचा काय संबंध लावायचा. हा योगायोग समजायचा की आणखी काय समजायचे ?

देसाई म्हमाले, काल परवा या देशात या राज्यात जे आपल्या विरोधात आवाज उठवतील, लिहितील आणि बोलतील, जे आपल्या विचाराचे नाहीत. त्यांना ईडी, सीबीआय, पोलीस, इन्कम टॅक्स अशा यंत्रणांच्या माध्यमातून अडकवले जात होतं तुरुंगात डांबले जात होतं,  परंतु आता हे सरकार आणखी एक पाऊल पुढे गेले आहे जे आपल्या विरुद्ध लिहितील, बोलतील त्यांच्या हत्या होऊ लागले आहेत.

पत्रकार परिषद यांच्या खुनामागचे खरे सूत्रधार जोपर्यंत तुरुंगात पाठवले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही आवाज उठवत राहू. केंद्र सरकारने केवळ पत्रकार वारसा यांच्याच नव्हे तर या कोकणात यापूर्वी झालेल्या चार-पाच हत्येच्या प्रकरणी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नियुक्त करावी अशी मागणी आम्ही करणार आहोत, असे खासदार राऊत यांनी म्हटले होते. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मंत्री ना शंभूराज देसाई लोक त्यांना ऐकायचे आता बंद करतात. त्यांची दखल सुद्धा घ्यायची गरज नाही, असा शब्दांत मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार राऊत यांच्या आरोपांना उडवून लावले.

तसेच याबाबत पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी हे प्रकरण गंभीर पणे घेतले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. त्यांचा अपघात झाला का खून झाला झाला असेल तर ती परिस्थिती काय होती कोणी खून केला, या सगळ्या गोष्टी चौकशांती बाहेर येतील असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार अनिल राव बाबर यांना मंत्री पद मिळणार का या प्रश्नावर " आगामी अर्थसंकल्पापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि विटेकरांना गोड बातमी समजेल" असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news