Pathaan Teaser : शाहरुखकडून वाढदिवसानिमित्त चाहत्‍यांना सरप्राईज, ‘पठान’चा टीझर रिलीज

shahrukh khan
shahrukh khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचा आज ५७ वा वाढदिवस आहे. या निमित्त त्‍याने फॅन्सना एक सरप्राईज दिले आहे. शाहरुख खानने त्‍याचा बहुचर्चित  'पठाण' चित्रपटाचा टीझर सकाळ रिलीज केला आहे. (Pathaan Teaser) शाहरुखने ट्विटर लिहिलं आहे की, 'आपल्या खुर्चीची पेटी बांधा. #PathaanTeaser आऊट! ५ जानेवारी २०२३ रोजी तुमच्या जवळच्या मोठ्या स्क्रीनवर #YRF50 सह #Pathan साजरा करा. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होत आहे. यासह शाहरुखने दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांना टॅग केले आहे. (Pathaan Teaser)

शाहरुख खानचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. चाहते या ट्विटला  लाईक आणि शेअर करत आहेत. पोस्टवर टिप्पणी करताना, एका युजरने पठाण चित्रपटाचे वर्णन २०२३ चा ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणून केला आहे. दुसर्‍या युजरने लिहिले आहे की, 'चित्रपट सुपर डुपर ब्लॉकबस्टर आहे'.

आणखी एका युजरने लिहिलंय, 'वाह याला डबल धमाल म्हणतात'. त्याचवेळी, बहुतेक लोक शाहरुखच्या या पोस्टवर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. शाहरुख खान आज ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. दरवेळेप्रमाणेच यावेळीही शाहरुख खान वाढदिवसानिमित्त चाहत्यांना भेटण्यासाठी मन्नतच्या टेरेसवर पोहोचला. मध्यरात्री बाल्कनीत जाऊन त्यांनी चाहत्यांची भेट घेतली. शाहरुखच्या मन्नत या बंगल्याबाहेर हजारो लोक दिसले. शाहरुखच्या वाढदिवशी दिवाळीसारखे वातावरण पाहायला मिळाले. किंग खानचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा देताना आणि आनंदाने त्यांचे प्रेम स्वीकारताना दिसत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news