Jawan : ‘जवान’चे वर्ल्डवाईड धासू कलेक्शन! बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा गल्ला

जवान चित्रपट
जवान चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : जवान चित्रपट ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज झालाय. तेव्हापासून शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Jawan) अनेक रेकार्ड तोडले आहेत. एटली दिग्दर्शित चित्रपटाने सर्व भाषांमध्ये घरेलू बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. एका रिपोर्टनुसार, जवानने मंगळवारी १४ कोटींचे कलेक्शन केलं. भारतात रिलीज झाल्यानंतर १३ दिवसांनी आता ही कमाई ५०७.८८ कोटी रु. झाली आहे. (Jawan)

जवान रिलीज झाल्यानंतर भारतात ७५ कोटी रुपये कमावले. ही कमाई रविवारी ८० कोटीपर्यंत पोहोचली. पहिल्या आठवड्यात ३८९ कोटी रुपये कमावले आणि आता बॉक्स ऑफिसवर दुसरा आठवडा पूर्ण करण्याआधीच या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

बाहुबली: द कन्क्लूजन आणि गदर 2 तसेच पठाननंतर आता जवान हा भारतातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे.

वर्ल्डवाईड कलेक्शन

या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ९०७.५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जवान या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि संजय दत्त कॅमिओमध्ये असून लहर खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, नयनतारा यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news