Shahrukh Khan Mannat: शाहरुखच्या ‘मन्नत’ला डायमंडची नेमप्लेट! जाणून घ्या काय आहे खास?

mannat
mannat
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता शाहरुख खानच्या बांद्रा येथील बंगला 'मन्नत'चा नवा लूक समोर आला आहे. (Shahrukh Khan Mannat) मन्नतच्या बंगल्याबाहेर एक नवी नेमप्लेट पाहायला मिळतीय. ती LED असून,अंधार पडल्यानंतर उजळते. त्याच्या घराच्या समोरचे दृश्य अगदी हटके दिसत आहे. याच ठिकाणी चाहते दररोज फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी जातात. कलाकार देखील खास प्रसंगी चाहत्यांना भेटायला येतात; पण मन्नतच्या लेटेस्ट लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. नेमप्लेटमध्ये काय खास आहे, आणि काय बदल करण्यात आले आहेत याविषयी जाणून घेवूया…  (Shahrukh Khan Mannat)

शाहरुख खानचा 'मन्नत'चा लूक बदलला

शनिवारी रात्री आणि रविवारी अनेक चाहत्यांनी आणि शाहरुख खानच्या फॅन क्लबने मन्नतच्या नव्या लूकचे फोटो शेअर केले. गेटसमोरील नावाची पाटी या वर्षीच्या सुरुवातीलाच दुरुस्त करण्यात आली होती. आता, एक नवीन नेम प्लेट बसवण्यात आली आहे, ज्याला अनेक चाहते 'डायमंड नेम प्लेट' म्हणतात. जुन्या गेटच्या जागी नवीन गेट बसवण्यात आले.

'मन्नत'ची हटके नेमप्लेट

मन्नतची छायाचित्रे आणि व्हिडिओ ट्विट करत एका फॅन क्लबने लिहिले, "अखेर आमची प्रतीक्षा संपली आणि आमच्याकडे नवीन गेटसह मन्नत येथे आमच्या सुंदर डायमंड नेम प्लेट्स आहेत." यावर मन्नत आणि लँड्स एंड असे लिहिलेले आहे. या नेमप्लेट्स अंधारात चमकतात. इतर अनेक फॅन क्लब्सनी रविवारी देखील दिवसाचे फोटो शेअर केले. चाहते नवीन गेटसमोर फोटोसाठी पोज देताना दिसले. काहींनी शाहरुखची नक्कल करत पोजदेखील दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news