School Dropouts in India: कर्नाटकसह ७ राज्यात माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त

School Dropouts in India: कर्नाटकसह ७ राज्यात माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकसह सात राज्यात माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त (School Dropouts in India) आहे, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणाऱ्या प्रोजेक्ट अप्रुवल मंडळाने दिली आहे.

माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची (School Dropouts in India) राष्ट्रीय सरासरी 12.6 टक्के इतकी आहे. या सरासरीपेक्षा जास्त प्रमाण असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटक, बिहार, गुजरात, आसाम आणि पंजाब यांचा समावेश आहे. समग्र शिक्षण मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांची शालेय गळती थांबविण्याची योजना सरकारने हाती घेतली आहे. या अनुषंगाने गत मार्च आणि मे महिन्यात राज्य सरकारांसोबत बैठकाही घेण्यात आल्या होत्या. वर्ष 2030 पर्यंत विद्यार्थ्यांचा ग्रॉस एनरोलमेंट रेट (जीईआर) 100 टक्क्यांवर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

वर्ष 2021-22 मध्ये बिहार राज्यात माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 20.46 टक्के इतके होते. गुजरातमध्ये हेच प्रमाण 17.85 तर आसाममध्ये 20.3 टक्के इतके होते. याशिवाय आंध्र प्रदेशात 16.7, पंजाबमध्ये 17.2, मेघालयमध्ये 21.7 तर कर्नाटकमध्ये 14.6 टक्के असे हे प्रमाण होते. ज्या राज्यातील गळतीचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. त्यात प. बंगालचा समावेश आहे. महाराष्ट्राचा विचार केला, तर या राज्यात माध्यमिक स्तरावर शाळा सोडण्याची टक्केवारी 10.7 टक्के इतकी आहे. मात्र, राज्यातील पाच जिल्ह्यात अजूनही हे प्रमाण 15 टक्क्यांच्या वर आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news