‘किंसिंग’ प्रकरणी अभिनेत्री शिल्‍पा शेट्टी ‘दोषमुक्‍त’आदेश कायम

‘किंसिंग’ प्रकरणी अभिनेत्री शिल्‍पा शेट्टी ‘दोषमुक्‍त’आदेश कायम
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अभिनेत्री शिल्‍पा शेट्टीविरुद्धच्‍या अश्‍लीलतेच्‍या गुन्‍ह्यात महानगर दंडाधिकार्‍यांनी दिलेला 'दोषमुक्‍त'चा आदेश सत्र न्‍यायालयाने कायम ठेवला आहे. महानगर दंडाधिकार्‍यांच्‍या आदेशाला आव्‍हान देणार्‍या राज्‍य शासनाने दाखल केलेला अर्ज न्‍यायालयाने फेटाळून लावला आहे. ( Richard Gere kissing case)

Richard Gere kissing case : काय घडलं होतं?

२००७ मध्‍ये राजस्‍थानमध्‍ये 'एचआयव्‍ही' जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाला हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे आणि अभिनेत्री शिल्‍पा शेट्टी यांची प्रमुख उपस्‍थिती होती. यावेळी रिचर्ड गेरे यांनी शिल्‍पा शेट्टीचे सार्वजनिकपणे चुंबन घेतले होते. या प्रकरणी राजस्‍थानमधील मुंडावार येथे दोघांवरही  भारतीय दंड संहिता ( आयपीसी) कलम २९२, २९३,२९४ ( अश्‍लीलता) तसेच माहिती तंत्रज्ञान आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायद्यान्‍वये गुन्‍हा दाखल झाला होता.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिली होती प्रकरण हस्‍तांतरित करण्‍यास परवानगी

प्रकरण मुंबईला हस्तांतरित करण्याच्या शिल्‍पा शेट्टीच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये परवानगी दिली होती, त्यानंतर हस्तांतरण प्रकरणाची सुनावणी मुंबई महानगर दंडाधिकार्‍यांसमोर झाली. अभिनेता रिचर्ड गेरे याच्‍या कृत्‍याला शिल्‍पा शेट्टी बळी पडली, असे निरीक्षण नोंदवत २७ जानेवारी २०२२ रोजी या प्रकरणी महानगर दंडाधिकार्‍यांनी शिल्‍पा शेट्टीची निर्दोष मुक्‍तता केली होती. या आदेशाला महाराष्‍ट्र सरकारने सत्र न्‍यायालयात आव्‍हान दिले होते. हा आदेश बेकायदेशीर आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरुद्ध होता, असे सरकारने म्‍हटले होते. आता मुंबई सत्र न्‍यायालयाने महानगर दंडाधिकार्‍यांनी दिलेला आदेश कायम ठेवत शिल्‍पा शेट्टीला दिलासा दिला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news