serial killer : देवमाणूस सिरीयल प्रमाणे या माथेफिरुने केली चार तरुणींची हत्या

serial killer : देवमाणूस सिरीयल प्रमाणे या माथेफिरुने केली चार तरुणींची हत्या
Published on
Updated on

नवी दिल्ली : फरिदाबाद मध्ये देवमाणूस या सीरियल प्रमाणे एका माथेफिरुने गेल्या तीन वर्षांमध्ये एकूण चार मुलींची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ३१ डिसेंबरला फरिदाबाद मध्ये एका हत्येच्या ( serial killer ) प्रकरणात अटक केलेल्या आरोपीबाबत एक वेगळीच माहिती समोर आली आहे. या माहितीने पोलीसही चक्रावले आहेत. कारण हा आरोपी एक सीरियल किलर असून त्याने गेल्या तीन वर्षांमध्ये एकूण चार मुलींची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीवरून, या सीरियल किलरचं ( serial killer ) नाव सिंहराज असे आहे. हा चंदिगडच्या सेक्टर-१६ मध्ये १० वर्षांपूर्वी बंद झालेल्या एका खासगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून तो काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, सिंहराज याला आपला अपमान झालेला सहन होत नसे, सिंहराज याच्यावर १९८६ साली काका आणि चुलत भावाच्या हत्येचा आरोप झाला होता. मात्र, पुराव्यांअभावी त्याची सुटका झाली होती. या घटनेनंतर त्याने छायंसा गाव सोडून चंदिगडमधील सेक्टर-१६ मधील दहा वर्षांपूर्वी बंद झालेल्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यास सुरूवात केली होती.

याच ठिकाणी उत्तर प्रदेशातून आलेल्या एका कुटुंबाची चहाची टपरी होती. २०१९ मधील डिसेंबर महिन्यात सिंहराजने या टपरीवरून चहा घेतला आणि काही बिस्किटे गुपचूप खिशात घातली व त्याचे पैसे न देताच तो तिथून जाऊ लागला. हे त्या ठिकाणी काम करत असलेल्या मुलाने पाहिले असता त्याला चोर म्हणून त्याचा अपमान करून तिथून हाकलून दिले. या घटनेनंतर त्याने या अपमानाचा बदला घ्यायचे ठरवले. म्हणून त्याने त्याचा अपमान केलेल्या मुलाच्या १४ वर्षीय बहिणीला रात्री बंद हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पिडीत मुलीने विरोध केल्यानंतर सिंहराजने तिची हत्या केली. ही त्याची पहिली हत्या ठरली. ( serial killer )

यानंतर सिंहराज ने दुसरी हत्या 2 ऑगस्ट 2020 रोजी केली. मार्केटमधून घरी जाणाऱ्या एका १२ वर्षांच्या मुलीला बोलण्यामध्ये गुंतवून तो तिला हॉस्पिटलच्या परिसरात घेऊन गेला. तिच्यावरसुध्दा त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण तिने विरोध केल्यानंतर तिची हत्या केली. या मुलीचे कुटुंबीय मेरठचे रहिवासी होते. ते सेक्टर १६ मध्येच राहत होते. ( serial killer )

गेल्या वर्षी मे महिन्यात त्या हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक १५ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या मुलीची हत्या सिंहराजनेच केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सिंहराजने या सर्व मुलींना गळा आवळून ठार केले होते. यानंतर त्यांचा मृतदेह एका पोत्यात भरून आग्रातील नाल्यामध्ये फेकून देत होता. या सर्व मुलींच्या कुटुंबीयांनी सेक्टर १७ मधील पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर त्याने तो गेल्या २ वर्षांपासून ओळखत असलेल्या एका २२ वर्षीय मुलीची हत्या केली.

फरिदाबाद मध्ये 31 डिसेंबर रोजी रात्री त्याने तिला काही कामानिमित्त बोलवून घेतले. तिला तो सेक्टर १७ च्या पुलाजवळ घेऊन गेला. त्याने तिची छेड काढण्यास सुरुवात केली. तरुणीने विरोध करताच त्याने तिचीच वेणी आणि मफलर वापरून तिचा गळा आवळून तिला ठार मारले. यानंतर तिचा मृतदेह नाल्यात फेकून दिला.

सिंहराजला वाटलं की, नाल्यातून मृतदेह वाहून जाईल आणि आपल्याला काहीच होणार नाही. मात्र, यावेळी त्या तरुणीचा मृतदेह झुडुपांमध्ये अडकून राहिला. याच दरम्यान, तरुणीच्या कुटुंबीयांनी तिची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. यातच पोलिसांना मृतदेह आढळला. मृतदेह आढळून आल्यानंतर तपासाला गती मिळाली. तपास करत पोलिसांनी आरोपी सिंहराजला वजीरपूर मास्टर रोडवरून अटक केली. या घटनेनंतर पोलिसांना पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर सिंहराजने आपला गुन्हा कबूल केला व त्याने यापूर्वी केलेल्या तीन हत्यांची कबुली दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news