Stock Market Closing Bell | RBI च्या निर्णयानंतर कोणते शेअर्स तेजीत? जाणून घ्या आजची बाजाराची स्थिती

Stock Market Closing Bell | RBI च्या निर्णयानंतर कोणते शेअर्स तेजीत? जाणून घ्या आजची बाजाराची स्थिती

पुढारी ऑनलाईन : भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शेअर बाजारात स्थिर पातळीवर व्यवहार दिसून आला. आजच्या काहीशा अस्थिर वातावरणात सेन्सेक्स २० अंकांच्या किरकोळ वाढीसह ७४,२४८ वर बंद झाला. तर निफ्टी २२,५१३ वर स्थिरावला. दरम्यान, आरबीआयच्या रेपो दर ६.५ टक्के एवढा कायम ठेवण्याच्या निर्णयाने बँकिंग शेअर्स तेजीत राहिले. तसेच फार्मा आणि रियल्टी क्षेत्रातही खरेदी झाली. पण आयटी शेअर्समध्ये घसरण झाली. (Stock Market Closing Bell)

क्षेत्रीय पातळीवर बँक, एफएमसीजी, रियल्टी प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. तर आयटी आणि मीडिया प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने दर कपातीवर कोणतेही संकेत न दिल्याने तसेच सलग सातव्यांदा रेपो दर ६.५ टक्के कायम ठेवल्यानंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर राहिले.

सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, एलटी, मारुती, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. तर कोटक बँक, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, एसबीआय हे शेअर्स सर्वाधिक वाढले.

निफ्टीवर अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासीम, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, एलटी हे शेअर्स हे घसरले. तर कोटक बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ, आयटी हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले.

बँकिंग शेअर्स तेजीत

निफ्टी बँक आज सुमारे १ टक्के वाढला. निफ्टी बँक तेजीत AU स्मॉल फायनान्स बँक, कोटक बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक हे शेअर्स आघाडीवर होते. हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. (Stock Market Closing Bell)

रियल्टी शेअर्सही वधारले

आरबीआयच्या निर्णयानंतर रियल्टी शेअर्स वधारले. निफ्टी रियल्टी निर्देशांकावर महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स, गोदरेज प्रॉपर्टीज, ओबेरॉय रियल्टी, डीएलएफ, ब्रिगेड एंटरप्रायझेस, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, द फिनिक्स मिल्स हे शेअर्स टॉप गेनर्स होते. यातील महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्सचा शेअर्स ६६९ रुपयांपर्यंत गेला. त्यानंतर तो २ टक्के वाढीसह ६४० रुपयांवर स्थिरावला. (Mahindra Lifespace Developers Share Price)

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news