Sensex hit Fresh record | मजबूत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्सने गाठला नवा उच्चांक, निफ्टी २१,५५० पार

Sensex hit Fresh record | मजबूत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्सने गाठला नवा उच्चांक, निफ्टी २१,५५० पार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारातील तेजीची घौडदौड कायम आहे. आज बुधवारी मजबूत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ४०० अंकांनी वाढून ७१,८४० चा टप्पा पार केला. सेन्सेक्सचा हा नवा विक्रमी उच्चांक आहे. तर निफ्टी ११३ अंकांनी वाढून २१,५६६ वर पोहोचला. शेअर बाजारातील विक्रमी तेजीत आयटी शेअर्स आघाडीवर आहेत. (Sensex hit Fresh record)

संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एनटीपीसी, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक हे टॉप गेनर्स आहेत. तर एम अँड एम, सन फार्मा या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे.

चीननंतर जपानच्या मध्यवर्ती बँकेनेही व्याजदरात कोणताही बदल केला नाही. यामुळे आशियाई बाजारात तेजीचा माहौल आहे. याचा मागोवा घेत भारतीय बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांनी बुधवारी नवीन विक्रमी उच्चांकावर व्यवहार सुरु केला.

देशांतर्गत मजबूत मॅक्रो इकॉनॉमिक डेटा, तेलाच्या घसरलेल्या किमती, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांकडून सतत होणारा ओघ, परकीय गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात खरेदी आणि अमेरिकेचा व्याजदराबाबतचा सुधारीत दृष्टीकोन यामुळेही शेअर बाजाराच्या वाढीला सपोर्ट मिळाला आहे.

जागतिक बाजार

अमेरिकेच्या शेअर बाजारातील डाऊ जोन्स, नॅस्‍डॅक कंपोझिट या निर्देशांकांनी सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. तसेच एस अँड पी निर्देशांकही काल वाढून बंद झाला. यामुळे आशियाई बाजारातही सकारात्मक वातावरण राहिले आहे. जपानचा निक्केई निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात १.६ टक्क्यांनी वाढला आहे. हाँगकाँगचा हँगसेंग १ टक्क्याने वाढला आहे. तर दक्षिण कोरियाचा कोस्पी १.६ टक्क्यांनी वाढला आहे.

परदेशी- देशांतर्गत गुंतवणूकदार

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) मंगळवारी ६०१ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) २९४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news