Stock Market Closing Bell | सेन्सेक्स सलग चौथ्या सत्रांत वाढून बंद, निफ्टी २२,४०५ वर

बीएसई आणि एनएसई
बीएसई आणि एनएसई

पुढारी ऑनलाईन डेस्क : सकारात्मक जागतिक संकेत आणि भारताची अपेक्षेपेक्षा चांगली जीडीपी वाढ आदींमुळे भारतीय शेअर बाजारात तेजी कायम राहिली आहे. निफ्टीने आज ट्रेडिंग सत्रात २२,४४० चा नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यानंतर निफ्टी २७ अंकांच्या किरकोळ वाढीसह २२,४०५ वर स्थिरावला. सेन्सेक्स ६६ अंकांनी वाढून ७३,८७२ वर बंद झाला. सेन्सेक्सने सलग चौथ्या सत्रात वाढ नोंदवली आहे. (Stock Market Closing Bell)

क्षेत्रीय आघाडीवर बँका, एनर्जी, इन्फ्रा आणि फार्मा वधारले. तर आयटी, मेटल, FMCG आणि ऑटोमोबाईलवर दबाव दिसून आला. आज सुमारे १,१६४ शेअर्स वाढले. तर २,२५६ शेअर्स घसरले आणि १०२ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. आज बाजारात सर्वाधिक खरेदी बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्समध्ये झाली, तर आयटी, एफएमसीजी आणि मीडिया शेअर्समध्ये विक्री झाली. विमा कंपन्यांच्या शेअर्समध्ये १ ते ३ टक्क्यांनी वाढ दिसून आली.

आजच्या ट्रेडिंग सत्रात एनटीपीसी, एचडीएफसी लाइफ आणि पॉवर ग्रिड सर्वाधिक वाढले. तर जेएसडब्ल्यू स्टील, आयशर मोटर्स आणि एम अँड एम यांना सर्वाधिक फटका बसला.

निफ्टीवर एनटीपीसी, एचडीएफसी लाईफ, बीपीसीएल, ओएनजीसी, पॉवर ग्रिड हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर आयशर मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय लाईफ, ब्रिटानिया हे शेअर्स घसरले.

सेन्सेक्स आज ७३ हजार ९०३ वर खुला झाला होता. त्यानंतर ७३,९०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर एनटीपी, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, रिलायन्स, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स तेजीत राहिले. तर जेएसडब्ल्यू स्टील, एम अँड एम, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, टायटन हे शेअर्स घसरले. (Stock Market Closing Bell)

गुंतवणूकदारांचे लक्ष या आठवड्यात होणाऱ्या यूएस फेडरल रिझर्व्हच्या हालचालीकडे आणि मॅक्रो डेटाकडे लागले आहे. ज्यामुळे बाजाराच्या मूडवर परिणाम होऊ शकते, असे संकेत बाजारातील विश्लेषकांनी दिले आहे.

 जागतिक बाजार

अमेरिकेतील शेअर बाजारातील S&P500 आणि Nasdaq Composite यांनी शुक्रवारी नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला होता. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातील जपानचा Nikkei 225 सोमवारी ४०,१०० हजारांवर बंद झाला. दक्षिण कोरियाचा कोस्पी १.२१ टक्क्यांनी वाढला.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news