पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (दि.१८) चौथ्या सत्रांत घसरण झाली. सुरुवातीला तेजी आणि नंतर घसरण दिसून आली. बाजारात आज गुंतवणूदार प्रॉफिट बुकिंगकडे वळले. त्यामुळे सेन्सेक्स, निफ्टी घसरले. सेन्सेक्स ४५४ अंकांनी घसरून ७२,४८८ वर बंद झाला. तर निफ्टी १५२ अंकांच्या घसरणीसह २१,९९५ वर स्थिरावला. मध्य-पूर्वेतील तणाव आणि कॉर्पोरेट कमाईच्या हंगामादरम्यान बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. (Stock Market Closing Bell)
फार्मा, बँकिंग आणि कन्झ्यूमर क्षेत्रात कमकुवत स्थिती राहिली. टेलिकॉम आणि मीडिया वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी घसरला आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला.
बाजारात सलग ३ सत्रांतील विक्रीनंतर गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात काही प्रमाणात खरेदी दिसून आली होती. पण त्यानंतर त्यात चढ-उतार दिसून आला. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ३५० अंकांनी वाढून ७३,३०० वर गेला. तर निफ्टीने २२,२५० च्या पातळीवर व्यवहार केला. (Stock Market Updates) पण त्यानंतर विक्री वाढल्याने बाजारात घसरण झाली. सुरुवातीला मिड आणि स्मॉलकॅप क्षेत्रात खरेदी दिसून आली होती. पीएसयू बँक, मेटल्स आणि रियल्टी शेअर्समधील तेजीचा बाजाराला सुरुवातीला काही प्रमाणात सपोर्ट मिळाला होता.
सेन्सेक्स आज ७३,१८३ वर खुला झाला होता. बाजार बंद होताना तो ७२,७०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर नेस्ले इंडियाचा शेअर्स टॉप लूजर्स ठरला. हा शेअर्स आज ३ टक्क्यांहून अधिक घसरून २,४५२ रुपयांपर्यंत खाली आला. ॲक्सिस बँकेचा शेअर्सही ३ टक्क्यांच्या घसरणीसह १,०१९ रुपयांवर आला. टायटन, इंडसइंड बँक, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, इंडसइंड बँक, मारुती हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले. दरम्यान, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, इन्फोसिस हे शेअर्स तेजीत राहिले.
निफ्टी ५० निर्देशांक २२,२१२ वर खुला झाला होता. त्यानंतर तो २२ हजारांच्या खाली घसरला. निफ्टीवर अपोला हॉस्पिटल, टायटन, नेस्ले इंडिया, कोल इंडिया, ओएनजीसी हे टॉप लूजर्स होते. हे शेअर्स ३ ते ४ टक्क्यांदरम्यान घसरले. तर भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, बजाज ऑटो हे शेअर्स तेजीत राहिले.
पब्लिक आयच्या तपासणीनुसार, नेस्लेच्या भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या दोन बेबी फूड ब्रँडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. तर ब्रिटन, जर्मनी स्वित्झर्लंड आणि इतर विकसित देशांमध्ये ही उत्पादने शुगर-फ्री आहेत. या वृत्तानंतर बीएसई सेन्सेक्सवर नेस्लेचे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक घसरले. यामुळे FMCG निर्देशांक कमकुवत झाला.
भारतातील दुसरी सर्वात मोठी IT सेवा कंपनी Infosys आज त्यांच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. त्याधीच इन्फोसिसच्या शेअर्सनी तेजीत व्यवहार केला. इन्फोसिसचा शेअर्स १,४४४ रुपयांपर्यंत वाढला. दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स १,४२३ रुपयांवर होता.
हे ही वाचा :