Closing Bell | शेअर बाजारात पैशांचा पाऊस! सेन्सेक्स १,२४० अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ६ लाख कोटींची वाढ, ‘हे’ ४ घटक ठरले महत्त्वाचे!

Sensex
Sensex

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, बँकिंग शेअर्समधील जोरदार खरेदीच्या जोरावर सोमवारी सेन्सेक्स तब्बल १,२०० हून अधिक अंकांनी वाढला. तर निफ्टीने २१,७०० चा टप्पा पार केला. हिरव्या चिन्हात खुला झाल्यानंतर भारतीय बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने आजच्या संपूर्ण ट्रेडिंग सत्रात त्यांचा नफा वाढवला. सेन्सेक्स १,२४० अंकांनी वाढून ७१,९४१ वर बंद झाला. तर निफ्टी ३८५ अंकांच्या वाढीसह २१,७३७ वर स्थिरावला. सेन्सेक्सची आजची वाढ १.७६ टक्के तर निफ्टी १.८० टक्क्यांनी वाढला.

बाजारातील आजच्या जोरदार खरेदीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २५ जानेवारीच्या ३७१.१२ लाख कोटींच्या तुलनेत आज सोमवारी ६ लाख कोटी रुपयांनी वाढून ३७७.१२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे १.६८ टक्के आणि १.०३ टक्क्यांनी वाढले.

सेन्सेक्स आज ७०,९६८ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७२ हजारांवर गेला. सेन्सेक्सवर रिलायन्स, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, एलटी, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, एसबीआय, बजाज फायनान्स, एचसीएल टेक, सन फार्मा, एचडीएफसी बँक हे शेअर्स सर्वांधिक वाढले. तर आयटीसी, इन्फोसिस, टेक महिंद्रा या शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरण दिसून आली.

निफ्टीवर ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी एंटरप्रायझेस, कोल इंडिया आणि अदानी पोर्ट्स टॉप गेनर्स होते. तर सिप्ला, आयटीसी, एलटीआयमिंडट्री, बजाज ऑटो आणि इन्फोसिस घसरले.

रिलायन्स शेअर्सची रॉकेट भरारी, एका दिवसात १.२ लाख कोटी नफा

हेवीवेट शेअर्स रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) मधील मजबूत वाढीचा सेन्सेक्सच्या रॉकेट भरारीला मोठा सपोर्ट मिळाला. या शेअर्समधील जोरदार खरेदीमुळे हा शेअर्स सेन्सेक्सवर टॉप गेनर ठरला. हा शेअर्स तब्बल ७ टक्क्यांनी वाढून २,९०१ रुपयांवर गेला. यामुळे भारतातील सर्वात मूल्यवान रिलायन्सचे शेअर्सचे बाजार भांडवल दिवसभरात १.२ लाख कोटी रुपयांनी वाढून १९.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. आजची तेजी ही रिलायन्ससाठी गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठी फायदेशीर राहिली.

एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये खरेदी

सोमवारच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या वाढीस एचडीएफसी बँकेच्या शेअर्सचेही मोठे योगदान राहिले. आज एचडीएफसी बँकचे शेअर्स जवळपास २ टक्क्यांनी वधारले. बँकिंग नियामकाने LIC ला देशातील सर्वात मौल्यवान बँकेमध्ये त्याची हिस्सेदारी वाढवण्याची परवानगी दिल्यानंतर HDFC बँकेचे शेअर्स जवळपास २ टक्क्यांनी वाढून १,४६२ रुपयांपर्यंत पोहोचले. देशाच्या बँकिंग नियामकाने LIC ला HDFC बँकेत अतिरिक्त ४.८ टक्के हिस्सेदारी घेण्याची परवानगी दिली आहे.

जागतिक बाजार

आज बहुतांश प्रमुख आशियाई निर्देशांकांनी सकारात्मक व्यवहार केला. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ३८१ अंकांनी वाढून ३६,१३२ वर गेला. चीनचा शांघाय कंपोझिट, हाँगकाँगचा हँग सेंग हेही वधारले. गेल्या शुक्रवारी अमेरिकेतील शेअर बाजारात संमिश्र स्थिती राहिली होती.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news