पुढारी ऑनलाईन : अमेरिकेची सेमीकंडक्टर निर्माता कंपनी एएमडीने (AMD) भारतात पुढील ५ वर्षांत ४० कोटी डॉलरची (सुमारे ३,२९० कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची घोषणा केली. कंपनी ही गुंतवणूक बंगळूर येथील प्लांटमधील करेल. यासोबतचे ३ हजार अभियंत्यांची भरती केली जाईल. एएमडीने सेमीकॉन इंडिया २०२३ (SemiconIndia 2023) मध्ये आज शुक्रवार या निर्णयाची घोषणा केली.
AMD ने भारतात ५ वर्षांत ४० कोटी डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा करत सांगितले की कंपनी भारताच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या उभारणीत एक मजबूत भागीदार असेल. कंपनी बंगळूरमध्ये नवीन संशोधन आणि विकास कॅम्पस सुरु करेल, जी जगातील सर्वात मोठी अशी सुविधा असेल.
"एएमडी ५ वर्षात भारतात ४० कोटी डॉलरची (USD 400 million) गुंतवणूक करेल," असे AMD चे व्हाइस प्रेसिडेंट आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (CTO) मार्क पेपरमास्टर यांनी येथे सेमीकॉन इंडिया २०२३ मध्ये संबोधित करताना सांगितले.
ते पुढे म्हणाले की, कंपनी २०२८ पर्यंत भारतात ३ अतिरिक्त अभियंत्यांची भरती करेल. आम्ही बंगळूर येथे आमचे सर्वात मोठे रिसर्च आणि डेव्हलमेंट सेंटर उघडणार आहोत. हे सेंटर हे वर्ष संपण्याआधी खुले केले जाईल.
गेल्या काही वर्षात एएमडीने भारतात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ वाढवले आहे. २००१ मध्ये कंपनीत खूप कमी कर्मचारी होते. आता कंपनीत ६,५०० हून कर्मचारी असल्याचे पेपरमास्टर यांचे म्हणणे आहे. भारतातील स्थानिक कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी तळागाळापर्यंत खूप चांगले काम केले असल्याचे त्यांनी नमूद केले. (SemiconIndia 2023)
हे ही वाचा :