Stock Market Closing Bell | सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी घसरला, ‘या’ स्टॉक्समध्ये विक्री, जाणून घ्या कोणते?

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी घसरला, ‘या’ स्टॉक्समध्ये विक्री, जाणून घ्या कोणते?

पुढारी ऑनलाईन : कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान आज शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स १०६ अंकांनी घसरून ६६,१६० वर स्थिरावला. तर निफ्टी १३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह १९,६४६ वर बंद झाला. ऊर्जा आणि रियल्टी निर्देशांक प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. तर मेटल, कॅपिटल गुड्स आणि हेल्थकेअर प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. तर बँकिंग, गॅस आणि ऑईल तसेच आयटी स्टॉक्समध्ये विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. (Stock Market Closing Bell)

सेन्सेक्स आज ६६,२६६ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६६,३५१ पर्यंत गेला. सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, एचडीएफसी, टाटा मोटर्स, टीसीएस, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक हे शेअर्स १ ते सुमारे २ टक्क्यांपर्यंत घसरले. इन्फोसिस, मारुती, टेक महिंद्रा, टायटन हे शेअर्सही घसरले.

एनटीपीसी शेअरने उच्चांक गाठला

सरकारी कंपनी नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन म्हणजेच एनटीपीसीचा शेअर सेन्सेक्सवर टॉप गेनर ठरला. हा शेअर ४ टक्के वाढून २१० रुपयांवर पोहोचला. या शेअरचा हा नवा विक्रम आहे. तब्बल एक दशकानंतर हा शेअर उच्च पातळीवर पोहोचला. एनटीपीसीचा शेअरमधील तेजीमुळे या कंपनीचे बाजार भांडवल २ लाख कोटी रुपयांच्या पार झाले. त्यासोबतच पॉवर ग्रिडचा शेअर २.८५ टक्के २५७ रुपयांवर गेला. एम अँड एम, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स हे शेअर्स वाढले.

निफ्टीवर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये एम अँड एम, टेक महिंद्रा, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, नेस्ले इंडिया आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज यांचा समावेश होता. तर सिप्ला, सन फार्मा, डिव्हिस लॅब्स, अपोलो हॉस्पिटल्स आणि भारती एअरटेल यांचे शेअर्स तेजीत राहिले.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा

दरम्यान, भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ कमी झाला आहे. NSE डेटानुसार, गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३,९७९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २,५२८ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. (Stock Market Closing Bell)

जागतिक बाजारात कमजोर स्थिती

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या निर्णयानंतर येथील शेअर बाजारात घसरण दिसून आली. जपानची मध्यवर्ती बँक कडक धोरण राबवणार असल्याच्या शक्यतेने आशियाई बाजारातही घसरण पाहायला मिळाली. (Stock Market Updates) जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.४० टक्क्यांनी घसरून ३२,७५९ वर आला. टॉपिक्स निर्देशांक ०.२० टक्क्यांनी घसरून २,२९० वर स्थिरावला.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news