Audi car : ऑडी कारमधून भाजी विक्री करणारा शेतकरी; व्हिडीओ व्हायरल

Audi car : ऑडी कारमधून भाजी विक्री करणारा शेतकरी; व्हिडीओ व्हायरल

चेन्नई : शेतकर्‍यांसमोरील अडचणींचा डोंगर सर्वश्रुत आहे. पिकांना योग्य भाव न मिळणे, कर्जात बुडून जाणे, सातत्याने आर्थिक अरिष्टात असणे अशा प्रतिकूल परिस्थितीला बहुतांशी शेतकर्‍यांना सामोरे जावे लागते. आता हे सर्व शेतकरी नेहमी आर्थिक अडचणीत असतात, असेच चित्र दर्शवेल; पण असे अजिबात नाही. कारण, काही शेतकरी अगदी गर्भश्रीमंत असतात. सध्या अशाच एका श्रीमंत शेतकर्‍याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या गर्भश्रीमंत Audi car शेतकर्‍याचा आदर्श प्रत्येक सर्वसामान्य शेतकर्‍याने आपल्यासमोर ठेवावा, असे म्हटले तरी गैर ठरू नये.

इन्स्टाग्राम यूजर सुजित असे या गर्भश्रीमंत शेतकर्‍याचे नाव आहे. मागील 10 वर्षांपासून सुजित शेती करत असून शेतीतील अभिनव प्रयोगासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित केले गेले आहे. सुजित यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते भाजी विकण्यासाठी चक्क ऑडी कार Audi car घेऊन जात असतात!

व्हायरल व्हिडीओत सुजित आपल्या पांढर्‍या ऑडीतून मार्केटला भाजी विकण्यासाठी जात असल्याचे दिसून येते. कार पार्किंग केल्यानंतर ते टी शर्ट हाफ पँट परिधान करतात आणि जमिनीवर चटई अंथरुन तेथेच भाजी विक्रीचे छोटे दुकान थाटतात. भाज्या विकून झाल्यानंतर ते पुन्हा एकदा पारंपरिक लुंगी परिधान करतात आणि पुन्हा कारमध्ये बसून Audi car निघून जातात.

आतापर्यंत हा व्हिडीओ 78 लाख जणांनी पाहिला आहे. यावर अनेकांनी बर्‍याच प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एक यूजर म्हणाला, आता ऑडी Audi car घ्यायला हवी, त्यानंतरच मी बाजारात भाजी विकण्यास जाऊ शकेन, इतके मला कळालेले आहे. आणखी एक यूजरने हा शेतकरी तर बराच श्रीमंत दिसतो आहे, अशी टिपणी केली तर आणखी एका यूजरने सहजतेने नमूद केले, मला अशी आशा आहे की, सारेच शेतकरी इतके गर्भश्रीमंत व्हावेत!

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news