‘सावित्री’चे स्वप्न पाहणारी बोधेगावची सलमा देशसेवत

‘सावित्री’चे स्वप्न पाहणारी बोधेगावची सलमा देशसेवत

बोधेगाव : काहीतरी मोठं करण्याची इच्छाशक्ती तुम्हाला एका नव्या उंचीवर पोहोचविते, असंच काहीसं बोधेगावच्या मुलीने करून दाखवलं आहे. सलमाने तिचं मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे. शेवगाव तालुक्यातील, तसेच फकीर सामाजातील पहिल्या मुलीने भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केेले. फकीर वाड्यात राहणारे वडील महेबबू फकीर पोस्टात बाह्य रोजंदारी कामगार म्हणून काम करतात. त्यांची ही मुलगी सलमा. सलमा फकीरची सैन्याच्या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कॉन्स्टेबल (जीडी) पदावर तिची निवड झाली आहे. तिच्या या यशाबदल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सलमा फकीरने हे यश अतिषय खडतर प्रवास करीत मिळवले आहे.

तिच्या स्वप्न रुपी पंखांना बळ
पदवीपर्यंच्या शिक्षणानंतर तिने स्वराज करिअर अ‍ॅकॅडमीत प्रवेश घेतला. इथेही तिला अ‍ॅकॅडमीचे संचालक शाहनवाज बागवान आणि नवाज पठाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तिच्यातील जिद्द अन् चिकाटी पाहून तिच्या स्वप्न रुपी पंखांना बळ देण्याचे काम केले अन् आज त्याचे चांगले रिजल्ट त्यांना मिळाला आहे.

शिक्षणाचे धडे जिल्हा परिषद शाळेतून
सलमाचे पहिले ते चौथीपर्यंतचे शिक्षण बोधेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले, तर पाचवी ते बारावीपर्यंचे शिवाजी हायस्कूलमध्ये झाले. पदवीचे शिक्षण बोधेगावातीलच काकडे महाविद्यालयात झाले आहे.

आईबरोबर मोलमजुरी
घरची परिस्थिती अतीशय हालाकीची, वडील पोष्टात बाह्य रोजंदारी कामगार, तर आई शेतमजुरीचे काम करतच शिक्षणही सुरू ठेेवले. एक लहान भाऊ तोही शिक्षण घेतो आहे. सुटीच्या दिवशी आईबरोबर मोलमजुरी करण्यासाठी जायचे अन् कुटंबाला आर्थिक हातभार लावायचा, असा तिचा दिनक्रम होता. शासकीय नोकरीत तर सोडाच, कुटुंबात काय त्यांच्या समाजात कोणी मुलगी शिक्षकलेली नाही. आजोबा बालम फकीर डाक मन होते. त्यांच्या जागेवर वडील महेबुब पोष्टात रोजंदारीवर लागले.

शिक्षणाची लहानपणापासून आवड होती. पुढे देशसेवा आणि समाजासाठी काहीतरी करायचे म्हणून सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मार्गक्रम पतकारला. हेसर्व पूर्ण करताना भाऊ सुहैलची साथ मोलाची मिळाली. माझ्या फिजिकल फिटनेससाठी तो पहाटे उठून माझ्या बरोबर पळायचा. तसेच, गोळाफेक, लांब उडी यात त्याने मोलाची साथ दिली. दुसरी सर्वात म्हतवाची बाजू म्हणजे करिअर मार्गदर्शनाची बाजू संभाळली ती म्हणजे नवाब सर आणि शाहनवाज सर यांनी. दोन वर्षाचे अ‍ॅकॅडमीक शिक्षण मी एकाच वर्षात पूर्ण केले.
                                                      – सलमा फकीर, 'बीएसएफ'मध्ये भरती

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news