पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीवर चर्चा सुरु आहे. या राजकीय फुटीमुळे महाराष्ट्रातील राजकारणावर दूरगामी परिणाम होतील, अशीही चर्चा आहे. आपल्याकडे राजकीय पक्षातील फूटीवर चर्चा सुरु असतानाच इंग्लंडपासून फारकत घेत ऑर्कने बेटच दुसर्या देशात विलीन होण्याची इच्छा व्यक्त करत आहे. जाणून घेवूया हे बेट कोणते आणि काय आहे येथील नागरिकांची मागणी. ( Orkney Islands )
ऑर्कने नावाचे बेट स्कॉटलंडच्या ईशान्य किनार्यावर आहे. १४७२ मध्ये ऑर्कने बेटावर ( Orkney Islands ) नॉर्वेजियन आणि डॅनिश राजवटीचे वर्चस्व होते. स्कॉटलंडचा राजा जेम्स तिसरा याच्याशी डेन्मार्कची राजकुमारी मार्गारेटचे लग्न झाले. या लग्नात हुंडा म्हणून हे बेट स्कॉटलंडला देण्यात आले होते. सध्या हा प्रदेश इंग्लंडकडे आहे. मात्र आता याच बेटावरील नागरिक इंग्लंडला सोडून नॉर्वे देशात विलीन होण्याचा विचार करत आहे.
ऑर्कने बेटावरील नागरिक इंग्लंडसोडून नॉर्वेमध्ये विलीन होण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात स्थानिक परिषदेने ऑर्कने बेटाची ब्रिटनमधील कायदेशीर बदलून नवीन पर्याय शोधतील, असा प्रस्ताव मांडला आहे. या बेटावर वास्तव्य करणार्या नागरिकांनी आर्थिक संधी मिळावी, म्हणून नॉर्वेत ऑर्कन बेट विलीन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असे स्थानिक परिषदेचे नेते जेम्स स्टॉकन यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात स्टॉकन सांगतात की, शेटलँड आणि वेस्टर्न बेटांच्या तुलनेत ऑर्कनेला एडिनबर्ग आणि लंडन या दोन्ही सरकारांनी कमी प्रमाणात पाठिंबा दिला आहे. दरडोई कमी निधी मिळत आहे, असे गार्डियनच्या रिपाेर्टमध्ये म्हटले आहे.
नॉर्वेमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव आणणारे स्थानिक परिषदेचे नेते जेम्स स्टॉकन यांनी म्हटले आहे की, आम्ही नाॅर्वेमध्ये सहभागी झालाे तर आपल्या ऊर्जा उत्पादन क्षमतेचा फायदा होईल. फ्लोटा बेटावरील तेल टर्मिनल आणि इतर नवीन संसाधनांसह अधिक आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. आजपर्यंत इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेत ऑर्कनेच्या योगदानाचे सखोल विश्लेषणच झालेले नाही. इंग्लंड आणि स्कॉटिश दोन्ही सरकाराकडून या बेटाला आर्थिक सहाय्याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोपही त्यांनी केला. इंग्लंड सरकारच्या विकसित प्रणाली अंतर्गत ऑर्कने बेटाला स्कॉटिश सरकारकडून वाटप केलेला निधी मिळतो. नॉर्वेमध्ये विलीन झाल्यानंतर अधिक प्रगतीचा मार्ग अधिक प्रशस्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आम्ही ब्रिटीनचा भाग होतो त्यापेक्षा जास्त काळ नॉर्स राज्याचा भाग होतो, ऑर्कनेच्या रस्त्यावर लोक येतात आणि मला म्हणतात की, "आम्ही हुंडा कधी परत करणार आहोत, आम्ही नॉर्वेला परत कधी जाणार आहोत.", असेही स्टॉकन यांनी सांगितले.
हेही वाचा :