COVID Man-Made : ‘कोरोना संसर्ग मानव निर्मितच, चीनच्या वुहान लॅबमधून फैलाव’; संशोधकाचा दावा

COVID Man-Made : ‘कोरोना संसर्ग मानव निर्मितच, चीनच्या वुहान लॅबमधून फैलाव’; संशोधकाचा दावा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना महामारी पसरवणारा 'कोविड-१९' हा विषाणू मानवनिर्मित असल्याची भीती सुरुवातीपासून व्यक्त करण्यात येत असलेली शंका खरी ठरताना दिसत आहेत. आता चीनच्या वुहान प्रयोगशाळेत काम करणाऱ्या एका शास्त्रज्ञाने कोविड-१९ विषाणू मानवनिर्मित असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. (COVID Man-Made)

चीनमधील वुहान येथील वादग्रस्त लॅबमधील एका अमेरिकन शास्त्रज्ञाने याबाबतचा दावा केला आहे, की कोविड-१९ हा मानवनिर्मित विषाणू होता आणि तो याच प्रयोगशाळेतून बाहेर पडला. अमेरिकेतील संशोधक अँड्र्यू हफ यांच्या दाव्यानुसार कोविड दोन वर्षांपूर्वी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (डब्ल्यूआयव्ही) मधून लीक झाला होता. ही लॅब चिनी सरकारद्वारे चालवली जात होती आणि चीन सरकार यास मोठा निधी उपलब्ध करुन देत होते. (COVID Man-Made)

वुहानबद्दलचे सत्य उघड (COVID Man-Made)

न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालात म्हटले आहे, की एपिडेमियोलॉजिस्ट अँड्र्यू हफ यांनी त्यांच्या नवीन पुस्तक 'द ट्रूथ अबाउट वुहान'मध्ये हा दावा केला आहे. हफचा यांचा दावा आहे की चीनमधील कोरोनाव्हायरस संशोधनासाठी अमेरिकन सरकारने निधी दिल्यामुळे ही महामारी उद्भवली आहे. हफ यांच्या पुस्तकातील काही उतारे 'द सन' या ब्रिटीश वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. ते EcoHealth Alliance या न्यूयॉर्क येथील संस्थेचे माजी उपाध्यक्ष आहेत. ही NGO संसर्गजन्य रोगांचा अभ्यास करते. त्यांनी त्यांच्या पुस्तकात दावा केला आहे की चीनचे Gain-of-Function Research पूर्ण असुरक्षित आहेत, ज्यामुळे वुहान लॅबमधून कोरोनाचा संसर्ग बाहेर पडला.

चीनकडून सातत्याने नाकारले सत्य

कोविड विषाणू मानवनिर्मित आणि वुहानच्या प्रयोगशाळेतून पसरत असल्याचा दावा यापूर्वीही करण्यात आला होता. मात्र, चीन सरकारने या दाव्यांचा सातत्याने इन्कार केला आहे. सरकारी अधिकारी आणि प्रयोगशाळेतील कर्मचारी या दोघांनीही या लॅबमध्ये विषाणूची उत्पत्ती झाल्याचे नाकारले आहे. (COVID Man-Made)

लॅबमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था नव्हती

संशोधक अँड्र्यू हफ यांनी त्यांच्या पुस्तकात दावा केला आहे, की या लॅबमध्ये योग्य जैवसुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापन व्यवस्था नव्हती. या कारणास्तव, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रयोगशाळेतून कोविड विषाणूची गळती झाली.

अमेरिकन सरकारलाही दिला दोष

शास्त्रज्ञ हफ यांनी 2014 ते 2016 पर्यंत इकोहेल्थ अलायन्समध्ये सेवा बजावली आहे. ते म्हणाले, अनेक वर्षे वुहान लॅबचा वापर इतर प्रजातींवर हल्ला करणाऱ्या वटवाघुळांची प्रजाती निर्माण करण्यासाठी करण्यात आला. त्यांना कोविड संसर्ग पसरवण्यास सक्षम बनवण्यात आले होते. धोकादायक जैवतंत्रज्ञान चिनी प्रयोगशाळेला अमेरिकेने हस्तांतरित केले, त्यामुळे कोरोना महामारीला चीन इतकेच अमेरिका सरकार सुद्धा दोषी असल्याचा आरोप या पुस्तकार करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज कोविड पॉझिटिव्ह

एकीकडे कोरोनाची उत्पत्ती चीन मधूनच झाल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज कोविड -19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही माहिती सोशल मीडियावर शेअर करताना त्यांनी स्वतःला आयसोलेट केल्याचे सांगितले. आता ते घरून काम करतील असे सांगितले आहे.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news