School Trip : शालेय सहलींमुळे एसटीला अच्छे दिन! सात दिवसांत राज्यभरात ५ हजार ६३७ एसटी बुक

School Trip : शालेय सहलींमुळे एसटीला अच्छे दिन! सात दिवसांत राज्यभरात ५ हजार ६३७ एसटी बुक

मुंबई : सुरेखा चोपडे,
शालेय सहलींचा प्रवास किफायतशी दरात आणि सुरक्षित व्हावा यासाठी राज्यातील विविध शाळांनी एसटीलाच पहिली पसंती दिली आहे. २८ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ या सात दिवसांच्या कालावधीत राज्यात तब्बल पाच हजार ६३७ एसटी सहलीसाठी बुक झाल्या.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष शालेय विद्यार्थ्यांच्या सहली काढण्यात आल्या नव्हत्या. मात्र कोरोनाचे संक्रमण घटल्याने निर्बंधामध्ये शिथिलता मिळाल्यानंतर मार्च २०२२ पासून शाळा पुन्हा सुरु झाल्या. त्यामुळे यंदा शाळांनी सहली काढल्या. शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरक्त इतर परिसराचीही माहिती मिळावी या हेतूने अनेक शाळांकडून शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येते. तर अनेक शाळा विविध पर्यटन स्थळी जाण्यास पसंती देतात.(School Trip)

सहलीचा प्रवास हा सुरक्षित व्हावा यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी यंदा एसटी बसलाच पसंती दिली आहे. एसटी शाळा – महाविद्यालयांना सहलीसाठी वर्षभर नैमित्तिक करारावर बस पुरविते. त्यापैकी साध्या बसवर ५० टक्के सवलत दिली जाते. उर्वरित प्रतिपुर्ती रक्कम राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभागाकडून महामंडळाला दिली जाते.

School Trip : एसी बसवर सवलतीची मागणी

आरामदायी प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्सला गेल्या काही वर्षापासून शाळा पसंती देत आहेत. एसटीकडे देखील एसी शिवशाही बस आहेत. परंतु शिवशाही बसला सहलीकरिता सवलत देण्यात येत नाही. त्यामुळे शाळांना साध्या बसच बुक कराव्या लागतात. परिणामी महामंडळाने सहलीकरिंता एसी बसवर सवलत देण्याची मागणी शाळांकडून होत आहे. यंदा शालेय शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढून सहली संदर्भात अटी- शर्ती निश्चित केल्या आहेत. त्यामध्ये केवळ एसटी मधूनच सहली नेण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे यावर्षी सहलीमधून महामंडळाला चांगले उत्पन्न मिळत आहे. दररोज ७०० ते ८०० एसटी सहलीकरिता द्यावा लागत आहेत.

सात दिवसातील सहलीसाठीच्या बसची संख्या

तारीख आणि एसटीची संख्या
२८ डिसेंबर -८५९
२९ डिसेंबर -९२३
३० डिसेंबर-९४५
३१ डिसेंबर -७१७
१ जानेवारी -५८४
२ जानेवारी -७५७
३ जानेवारी-८५२

महामंडळाला मिळालेले उत्पन्न

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news