बैलगाडी स्पर्धा, जालिकट्टू संदर्भातील सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार

सर्वोच्‍च न्‍यायालय (संग्रहित छायाचित्र)
सर्वोच्‍च न्‍यायालय (संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या बैलगाडीच्या शर्यती तसेच तामिळनाडूतील जालिकट्टू खेळाला देण्यात आलेल्या परवानगीला आक्षेप घेत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.

बैलगाडी शर्यती आणि जालिकट्टूला देण्यात आलेली परवानगी घटनाबाह्य असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. सदर प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ, न्यायमूर्ती अजय रस्तोगी, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती ऋषीकेश रॉय आणि न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या घटना पीठासमोर सुरु आहे. तामिळनाडू सरकारने जालिकट्टूला परवानगी देण्याच्या अनुषंगाने प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यात सुधारणा केली होती. अशीच कायद्यातील सुधारणा महाराष्ट्र सरकारकडून देखील करण्यात आली होती. तामिळनाडूतील कायद्यासंदर्भात घटनापीठासमोर सुनावणी होणे आवश्यक आहे, कारण त्यात घटनात्मक मुद्दे असल्याचे काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news