‘तो’ अर्ज सरन्यायाधीशांनी फेटाळला; एजींनी देखील विनंती अर्जावर नोंदवला आक्षेप

‘तो’ अर्ज सरन्यायाधीशांनी फेटाळला; एजींनी देखील विनंती अर्जावर नोंदवला आक्षेप

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेणाऱ्या घटनापीठातून सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी वेगळे व्हावे, अशी विनंती करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला. एंसन थॉमस नावाच्या हस्तक्षेपकर्त्याने हा अर्ज दाखल केला होता. अर्जावर सुनावणी घेत सरन्यायाधीशांनी तो फेटाळला.

देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी देखील अर्जावर आक्षेप नोंदवला. संबंधिताने विनंती अर्ज केल्याने मी अधिकृतरित्या या अर्जावर आक्षेप नोंदवतो, असे मेहतांनी सरन्यायाधीशांना सांगितले. सर न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्या. संजय किशन कौल, न्या.एस.रवींद्र भट, न्या.हिमा कोहली तसेच न्या. पी.एस.नरसिम्हा यांचे घटनापीठ याचिकांवर सुनावणी घेत आहे. १८ एप्रिलला याचिकांवर सुनावणी सुरू करण्यात आली होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news